नवी मुंबई : नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, नेरुळ येथे कोल्ड प्ले या जागतिक दर्जाच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे स्टेडियमला पेचारे कलावंत, महत्वाच्या व्यक्ती व प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व वाहतूक कोडी होऊ नये याकरीता दिनांक 18,19,20 रोजी दुपारी २ वा. ते रात्री १२ वाजेपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना शहराच्या सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास, प्रवेश करण्यास आणि वाहने उभी करण्यास पूर्णतः बंदीबाबत पोलीस उप आयुक्त (वाहतूक) नवी मुंबई यांनी वाहतुक नियंत्रण अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
डी. वाय. पाटील स्टेडियम वर 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी कोल्ड प्ले चे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी मुंबई शहरात दहा ते पंधरा हजार अधिकची वाहने येण्याची शक्यता वाहतूक पोलिसांनी वर्तवलेय. वाहनांच्या गर्दीमुळे शहरात वाहतूक कोंडी होणार असून त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 3 दिवस अवजड वाहनाना नवी मुंबईत प्रवेश बंदी करण्यात आलेय तसेच नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या अधिक बसगाड्या वाहतुकीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले असून कार्यक्रमाच्या दिवशी वाहतुकीतही बदल करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानिमित्त खासगी लोकल सेवा चालविण्यात येणार असल्याने रेल्वे प्रवाशांनाही त्याचा फटका बसणार आहे. खासगी वाहनांसाठी शहरातील विविध मैदाने आणि भूखंड आरक्षित ठेवण्यात येत असून चोख सुरक्षा ववस्था तैनात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमावेळी आवाजामुळे होणारा त्रास लक्षात घेता लहान मुलांना घेऊन जाण्यास जिल्हा बालसौरक्षण विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा : कडवईतील महाराष्ट्र हायस्कूलचा पहिला क्रमांक