ट्रॅफिकचा त्रास संपणार! 90 मिनिटांचा प्रवास 30 मिनिटांत; नेमकं कोणतं अंतर कमी होणार?

Mumbai News : मुंबईकरांचा येत्या काही दिवसात मुंबई आणि ठाण्यातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. नव्या पायाभूत सुविधा आणि पर्यायी मार्गांमुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

ट्रॅफिकचा त्रास संपणार! 90 मिनिटांचा प्रवास 30 मिनिटांत; नेमकं कोणतं अंतर कमी होणार?
Mumbai News

मुंबई : मुंबईकरांचे आता ट्रॅफिकमध्ये तासन्तास अडकण्याचे दिवस लवकरच संपणार आहेत. मुंबई ते ठाणे आणि वरळी ते नवी मुंबई प्रवास आता अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. एमएमआरडीएने यासाठी मेगा प्लॅन ही तयार केलेला आहे.

या प्लॅनमध्ये काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, रिंग रोड, भुयारी बोगदे, कोस्टल रोड, मेट्रोचे जाळे शिवायन नवीन जोडरस्ते यांचं नेटवर्क तयार केले जात आहे. या प्लॅनमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. विशेष म्हणजे, वरळीहून निघालेल्या प्रवासी कोस्टल रोडने थेट अटल सेतूला म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बल लिंकला जोडण्यात येणार आहे.

हेही वाचा – मुंबईतील 48 ब्लॅक स्पॉटवर सुरक्षा उपाययोजना! BMC करणार 18.25 कोटी खर्च

कोणता प्रवास किती वेळात पूर्ण होणार?
नव्या प्लॅननुसार, वरळी ते नवी मुंबई हा प्रवास फक्त 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण होणार आहे. ज्या प्रवासाला आधी 90 मिनिटे लागतात. शिवाय मुंबई ते ठाणे हे अंतर फक्त 25 मिनिटांमध्ये पार करता येईल. या नवीन मार्गांमुळे मुंबईकरांचा वेळ, इंधन आणि त्रास तिन्ही वाचणार असून जीवनमानही उंचावणार आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number