मुंबई : महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प (कोस्टल रोड) २० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाला आहे. या रस्त्याचे दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले केल्यानंतर आता वांद्रे-वरळी सी लिंक आणि कोस्टल रोड सुरू करण्याच्या दिशेने पालिकेचे नियोजन सुरू आहे. पालिकेकडून लवकरच कोस्टल रोडच्या उत्तर मार्गिकेचा आणखी एक भाग अंशतः खुला केला जाणार आहे.