अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबईतील धडाकेबाज कारवायांमध्ये एक मोठी बातमी समोर आली, ती म्हणजे डॉमिनोज पिझ्झाचे 3 आऊटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार FDA ने मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंटवर मोठी कारवाई करत तब्बल 17 हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानांचे परवाने रद्द केले आहेत.
मुंबईतील डॉमिनोजच्या ‘या’ आऊटलेट्सवर कारवाई –
1. परळ – दुकान क्र. 7,8,9,10 व 39, रंगोली टाइम कॉम्प्लेक्स, डॉ. आंबेडकर रोड
2. मरोळ, अंधेरी (पूर्व) – राज इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, मिलिटरी रोड
3. बोरिवली (पश्चिम) – निर्माण हाईट बिल्डिंग, लिंक रोड, डॉन बॉस्को स्कूलसमोर
FDA ने सांगितली धक्कादायक कारणे:-
1. कीटक आणि उंदरांचा वावर – दुकानात झुरळं आणि कीटकांचा प्रादुर्भाव, उंदरांनी कुरतडलेली अन्न पाकिटे आढळली.
2. अन्न हाताळणीत हलगर्जीपणा – खराब झालेले अन्नपदार्थ, जळलेले आणि अति-वापर झालेले तेलाचा वापर, कच्चे-शिजवलेले आणि शाकाहारी-मांसाहारी अन्न एकत्र साठवणूक.
3. प्रचंड अस्वच्छता -फरशी अस्वच्छ, अन्न हाताळणीच्या ठिकाणी साचलेले पाणी, उघड्या कचरापेट्या आणि अस्वच्छ फ्रिज.
4. नियमांचे उल्लंघन – दर्शनी भागात FSSAI परवाना न लावणे, पेस्ट कंट्रोल अहवाल नसणे, कामगारांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र नसणे, कामगारांकडे अप्रॉन, हेडगियर नसणे आणि सुधारणा नोटिसीचे पालन न करणे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.