ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील वातावरणात मोठा बदल झाला आहे. संपूर्ण राज्यातून मोसमी पावसाने माघार घेतल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून आता उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा कायम असून मुंबईत सरासरीहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबईतील तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसवर गेला आहे. मुंबईत आज 38.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने उष्णेच्या लाटेसदृश्य स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी संपूर्ण कोकण प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागात उष्णेतच्या लाटेसदृश्य स्थिती राहील.ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये रविवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.असताना, राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला आहे.
तसेच जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असून तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. दिवसभर उन्हाचे चटके आणि उकाड्यामुळे जळगावकर नागरिक हैराण झाले आहेत. कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना रुमाल, टोपी आणि इतर उपायांचा आधार घ्यावा लागत आहे. तापमानामुळे जळगावकर नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे.
धुळ्यात ऑक्टोबर हिटचा तडाका वाढला असून जिल्ह्याचे तापमान तब्बल 37 ते 28 अंशांवर पोहोचले आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस कमी झाल्याने उकाडा आणि तापमान अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, तसेच बाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल, गॉगल वापरून रसाळ फळांचे सेवन आणि भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिककरांना ऑक्टोबरमध्ये उन्हाचा चटका जाणवत आहे. नाशिकमध्ये सलग तीन दिवस कमाल तापमानाचा पारा 35 अंशांच्या पार गेला असून ऑक्टोबर अखेरपर्यंत तापमान 34 ते 36 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तावला आहे. सोमवारी शहरात 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याचे निदर्शनास आले.
पावसाची दडी, निरभ्र आकाश आणि मंदावलेला वारा यामुळे उकाड्यात वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेच उष्णतेमुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे देखील समोर आले आहे. राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत जात असताना वाढत्या तापमानामुळे आता धरणाच्या पाण्यात देखील घट होताना दिसत आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या खरीपाचा हंगाम वाया गेला आहे. कारण सगली पिकं करपून गेली आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.