Friday, May 24, 2024 09:35:08 AM

Megablock in Trans-Harbour route
तुर्भेतील तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. परंतु रेल्वेने हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करून ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आल्याने रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक कोळमडले आ

तुर्भेतील तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Railway

 मुंबई, १२ मे २०२४, प्रतिनिधी : रविवारी रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तीन रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. परंतु रेल्वेने हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करून ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आल्याने रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक कोळमडले आहे. तुर्भे या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने मेगाब्लॉक ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्यात आला आहे. लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारचा फटका प्रवाशांना बसत आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.


सम्बन्धित सामग्री