Wednesday, October 23, 2024 01:39:58 PM

Railway
आषाढी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेने ६४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

आषाढी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

मुंबई : पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेने ६४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे पंढरपूर आणि मिरजसाठी एकूण ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे. 

नागपूर - मिरज विशेष, नवी अमरावती - पंढरपूर विशेष, खामगाव - पंढरपूर विशेष, लातूर - पंढरपूर, भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष, मिरज - पंढरपूर अनारक्षित मेमू विशेष, मिरज - कुर्डूवाडी अनारक्षित मेमू विशेष या आषाढी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. 

नागपूर - मिरज विशेष (२ सेवा): गाडी क्रमांक ०१२०५ ही विशेष गाडी १४ जुलै २०२४ रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१२०६ विशेष ही गाडी १८ जुलै २०२४ रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल. या गाडीचे थांबे अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे व अरग असे असतील. या गाडीत १ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ९ सामान्य द्वितीय श्रेणी यासह २ सामान तथा गार्ड ब्रेक व्हॅन असतील.

नागपूर - मिरज विशेष (२ सेवा): गाडी क्रमांक ०१२०७ विशेष गाडी दिनांक १५ जुलै २०२४ रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०८ विशेष गाडी दिनांक १९ जुलै २०२४ रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल. या गाडीचे थांबे : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड ढालगाव, कवठेमहांकाळ, सलगरे व अरग.

नवी अमरावती - पंढरपूर विशेष (४ सेवा): गाडी क्रमांक ०१११९ विशेष नवी अमरावती येथून दिनांक १३ जुलै २०२४ आणि दि. १६ जुलै २०२४ (२ सेवा) रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०११२० विशेष पंढरपूर येथून दिनांक १४ जुलै २०२४ आणि दिनांक १७ जुलै २०२४ (२ सेवा) रोजी १९.३० वाजता सुटेल आणि नवी अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता पोहोचेल. या गाडीचे थांबे : बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी.

खामगाव - पंढरपूर विशेष (४ सेवा): गाडी क्रमांक ०११२१ विशेष खामगाव दिनांक १४ जुलै २०२४ आणि १७ जुलै २०२४ (२ सेवा) रोजी ११.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११२२ विशेष पंढरपूर येथून दिनांक १५ जुलै २०२४ आणि १८ जुलै २०२४ (२ सेवा) रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि खामगाव येथे त्याच दिवशी १९.३० वाजता पोहोचेल. या गाडीचे थांबे : जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी.

लातूर - पंढरपूर (१० सेवा): गाडी क्रमांक ०११०१ स्पेशल लातूर येथून दिनांक १२ जुलै २०२४, १५ जुलै २०२४, १६ जुलै २०२४, १७ जुलै २०२४ आणि १९ जुलै २०२४ (५ सेवा) ला ०७.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०२ विशेष पंढरपूर येथून १२ जुलै २०२४, १५ जुलै २०२४, १६ जुलै २०२४, १७ जुलै २०२४ आणि १९ जुलै २०२४ (५ सेवा) रोजी १३.५० वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी १९.२० वाजता पोहोचेल. या गाडीचे थांबे : हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री, कुर्डुवाडी आणि मोडलिंब.

भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष (२ सेवा): गाडी क्रमांक ०११५९ अनारक्षित विशेष भुसावळ येथून १६ जुलै २०२४ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० अनारक्षित विशेष पंढरपूर येथून १७ जुलै २०२४ रोजी २२.३० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचेल. या गाडीचे थांबे : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी.

मिरज - पंढरपूर अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा): गाडी क्रमांक ०११०७ मेमू विशेष मिरज येथून १२ जुलै २०२४ ते २१ जुलै २०२४ (१० सेवा) ०५.०० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी ०७.४० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०८ मेमू विशेष पंढरपूर येथून १२ जुलै २०२४ ते २१ जुलै २०२४ (१० सेवा) दरम्यान ०९.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १३.५० वाजता पोहोचेल. या गाडीचे थांबे : अरग, बेळंकी, सलगरे, कवठे महांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद आणि सांगोला.

मिरज - कुर्डूवाडी अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा): गाडी क्रमांक ०१२०९ मेमू विशेष मिरज येथून १२ जुलै २०२४ ते २१ जुलै २०२४ (१० सेवा) पर्यंत १५.१० वाजता सुटेल आणि कुर्डुवाडी येथे त्याच दिवशी १९.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२१० मेमू विशेष कुर्डुवाडी येथून १२ जुलै २०२४ ते २१ जुलै २०२४ (१० सेवा) पर्यंत २१.२५ वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ०१.०० वाजता पोहोचेल. या गाडीचे थांबे : अरग, बेळंकी, सलगरे, कवठे महांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद, सांगोला, पंढरपूर आणि मोडलिंब.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo