रेल्वेचा कडक नियम! आता कानाला हेडफोन नाही तर खिशाला भुर्दंड; नेमका निर्णय काय जाणून घ्या

रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, व्हिडिओ पाहणे किंवा मोठ्याने बोलून सहप्रवाशांना त्रास देणे आता महागात पडू शकते.
रेल्वेचा कडक नियम! आता कानाला हेडफोन नाही तर खिशाला भुर्दंड; नेमका निर्णय काय जाणून घ्या

मुंबई: रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, व्हिडिओ पाहणे किंवा मोठ्याने बोलून सहप्रवाशांना त्रास देणे आता महागात पडू शकते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने संबंधित प्रवाशांकडून पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांसह उपनगरी रेल्वेगाड्यांमध्येही काही प्रवासी हेडफोन न लावता मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी, बातम्या आणि व्हिडिओ पाहतात किंवा स्पीकरवर फोनवर बोलतात. त्यामुळे डब्यातील इतर प्रवाशांना, विशेषतः रात्रीच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागतो.

पहिल्यांदा समज, नंतर कारवाई
रेल्वे मंडळाच्या सूचनांनुसार, तिकीट तपासनीस, रेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) जवान, तसेच केटरिंग आणि अन्य ऑन बोर्ड कर्मचाऱ्यांना डब्यातील संबंधित प्रवाशांना सूचना देण्यास सांगण्यात आले आहे. मोबाईलचा आवाज कमी करणे, हेडफोनचा वापर करणे आणि सहप्रवाशांच्या सोयीचा विचार करणे याबाबत प्रवाशांना समज दिली जाईल. समज देऊनही एखादा प्रवासी नियमांचे उल्लंघन करत राहिल्यास त्याच्यावर कारवाई करून दंड आकारला जाऊ शकतो.

विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live

यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे प्रवाशांना सूचना दिल्या जाणार आहेत. दक्षिण रेल्वेने परिपत्रक काढून आपल्या विभागांना प्रवाशांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तर आणि पश्चिम रेल्वेनेही मोबाईलच्या गैरवापरामुळे प्रवाशांना होणारा त्रास रोखण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version