राज्यात उष्णतेचा चटका कायम, फक्त 6 जिल्ह्यांत पावसाची शक्यता, जाणून घ्या जिल्हानिहाय हवामानाचा रिपोर्ट

ऑक्टोबर हिटचा तडाखा आणि अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत.

राज्यात उष्णतेचा चटका कायम, फक्त 6 जिल्ह्यांत पावसाची शक्यता, जाणून घ्या जिल्हानिहाय हवामानाचा रिपोर्ट

ऑक्टोबर हिटचा तडाखा आणि अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे सध्या राज्यात दुहेरी हवामानाची स्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्याने तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला असून, वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तापमानात मोठी वाढ, सोलापूर राज्यात सर्वाधिक गरम
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 39 अंशावर पोहोचले आहे. काल सोलापूर जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी 39.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर यवतमाळ आणि अमरावतीमध्ये 39 अंश तापमान नोंदवले गेले. पाऊस गायब झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून बळीराजा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय
नैऋत्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून आज त्याची तीव्रता वाढून तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे.

आजचा जिल्हानिहाय अंदाज – 20 ऑक्टोबर

2 जिल्ह्यांना यलो अलर्ट –
हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे.

विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live

4 जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता -
रत्नागिरी, सातारा, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यांत कोणताही अलर्ट नसला तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

30 जिल्ह्यांत हवामान कोरडे -
उर्वरित 30 जिल्ह्यांत आज हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.

- कोकण: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड - कोरडे हवामान
- पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सोलापूर - कोरडे हवामान
- उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर - कोरडे हवामान
- मराठवाडा: बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली - कोरडे हवामान
- विदर्भ: अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली - कोरडे हवामान

एकूणच आज राज्यातील पावसाची शक्यता फक्त 6 जिल्ह्यांपुरती मर्यादित असून उर्वरित महाराष्ट्रात उष्णता आणि उकाडा कायम राहणार आहे. स्थानिक हवामानात बदल होऊ शकतो.

 

महाराष्ट्रातील सर्व बातम्या एका क्लिकवर

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number