शिवसेनेच्या आमदाराचा सरकारलाच घरचा आहेर; ‘चेष्टा चालू आहे का?’, म्हणत सुनावले खडेबोर

बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्याच सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आगाऊ मदतीवरून तीव्र शब्दांत टीका केली.

शिवसेनेच्या आमदाराचा सरकारलाच घरचा आहेर; ‘चेष्टा चालू आहे का?’, म्हणत सुनावले खडेबोर
sanjay gaikwad

बुलढाणा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने दिवाळीपूर्वी अग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपये जाहीर केलेत. मात्र ही मदत अपूर्ण असून राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केलं. मात्र सध्या हे आंदोलन एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. सरकारने पाच हजार रुपयाची मदत जाहीर केली, ती शेतकऱ्यांची चेष्टा आहे. असं विधान सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांनी केलंय. तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अपुरी म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होऊन शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी थेट सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.

हेही वाचा :सतेज पाटलांनी मैदान मारलं, दिग्गजांना चितपट केलं; गोकुळ दूध संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number