मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! समृद्धी महामार्गावर वाहतूक ब्लॉक; जाणून घ्या तारखा

समृद्धी महामार्गावर विशिष्ट कालावधीदरम्यान वाहतूक ब्लॉक राहणार असून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी वेळेचे नियोजन करावे.
मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! समृद्धी महामार्गावर वाहतूक ब्लॉक; जाणून घ्या तारखा

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज दरम्यान बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ आणि डोंगर उतारावर सुरक्षा जाळी बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर दरड किंवा दगड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी हे प्रतिबंधात्मक काम करण्यात येत आहे.

कधी असणार वाहतूक ब्लॉक?
या कामामुळे दि. 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीत टप्याटप्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधीत दररोज सकाळी 10 ते 11, दुपारी 1 ते 2 आणि दुपारी 4 ते 5 या तीन सत्रांमध्ये भरवीर ते इगतपुरी दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

हेही वाचा – कोकण-गोव्यात पावसाची हजेरी, मात्र मुंबईत उकाडा कायम; पुढील 48 तासांत तुरळक सरींचा अंदाज?

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर –

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

या वेळेत मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना काही काळ थांबवले जाईल. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रवासाचे नियोजन आधीच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांनी शक्य असल्यास ब्लॉकच्या वेळा वगळून प्रवास करावा, असे देखील सांगण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version