Mumbaicha Raja Visarjan 2026 : गणेशगल्लीचा गणपती ‘मुंबईच्या राजा’ मिरवणूकी संदर्भात महत्त्वाची बातमी! 22 फुटी भव्य मूर्तीचे विसर्जन थेट…

मुंबईच्या राजाच्या विसर्जनाचा तिढा अखेर सुटला आहे. गिरगाव चौपाटी येथे मुंबईचा राजा मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बैठक पार पडली असून, विसर्जनाबाबत बैठक सकारात्मक झाली आहे.

Mumbaicha Raja Visarjan 2026 : गणेशगल्लीचा गणपती ‘मुंबईच्या राजा’ मिरवणूकी संदर्भात महत्त्वाची बातमी! 22 फुटी भव्य मूर्तीचे विसर्जन थेट…
Mumbaicha Raja Visarjan

मुंबईच्या राजाच्या विसर्जनाचा तिढा अखेर सुटला आहे. गिरगाव चौपाटी येथे मुंबईचा राजा मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बैठक पार पडली असून, विसर्जनाबाबत बैठक सकारात्मक झाली आहे. यंदा मुंबईच्या राजाची 99 वी वर्षपूर्ती असून, प्रथमच 22 फुटी भव्य मूर्तीचे विसर्जन अत्याधुनिक बार्ज जहाजावरून थेट खोल समुद्रात करण्यात येणार आहे.

Ganpati Visarjan Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनाच्या दिवशी धावणार लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या; विरार ते चर्चगेट पाहा वेळापत्रक

सकाळी ठीक 8 वाजता विसर्जन सोहळ्याला सुरुवात होणार असून, सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत तराफ्यावरूनच विसर्जनाची प्रक्रिया पार पडणार आहे. या विसर्जनासाठी आवश्यक परवानगी मिळाल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. गणेशगल्लीचा ‘मुंबईचा राजा’ यंदा 99 व्या वर्षात पदार्पण करत असून, या निमित्ताने त्याच्या विसर्जन सोहळ्याचे भव्य नियोजन करण्यात आले आहे.

मात्र, बाप्पाच्या ऐतिहासिक विसर्जन मिरवणुकीला ऐनवेळी पोलिसांची आवश्यक परवानगी मिळालेली नसल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती होती. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला पोलिसांच्या परवानगीचा तिढा अखेर सुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number