साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी सरस्वतीसह आपल्या रोजच्या वापरातील अनेक उपकरणे आणि वस्तूंची हळद-कुंकू वाहून पूजा केली जाते. विद्यार्थी पुस्तकांचे तर व्यावसायिक त्यांच्या हिशेबाच्या वह्यांचे पूजन करतात. या परंपरेसोबतच दसऱ्याला दाराला बांधले जाणारे तोरण हे अतिशय वेगळे असते आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
तोरण कशापासून बनतं?
1. आंब्याची पाने – तोरणाचा हा मुख्य भाग आहे. 5, 7, 9 अशा विषम संख्येत आंब्याची पाने लावली जातात.
2. झेंडूची फुले – पिवळ्या आणि केशरी रंगाची झेंडूची फुले तोरणात गुंफली जातात.
3. भाताचे कणसे / धानाच्या लोंब्या – तोरणात वापरलं जाणारं हे मुख्य पीक आहे. नव्याने आलेल्या धानाच्या पिकाच्या लोंब्या म्हणजेच कणसे तोरणात बांधली जातात.
4. कुरडूची फुले – तोरणात दिसणारी छोटी पांढरी-गुलाबी फुले म्हणजे कुरडूची फुले. ही फुले तोरणाला अधिक आकर्षक बनवतात.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
धार्मिक कारण काय?
1. आंब्याच्या पानांचे महत्त्व: आंब्याची पाने शुभ आणि पवित्र मानली जातात. दाराला तोरण बांधल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर राहते, अशी मान्यता आहे.
2. झेंडूच्या फुलांचे कारण: पिवळा रंग हा समृद्धी आणि बृहस्पती ग्रहाचा प्रतीक मानला जातो. झेंडूची फुले घरात सकारात्मकता आणि आनंद आणतात.
हेही वाचा - दसऱ्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक का मानतात? जाणून घ्या विजयादशमीच्या पूजेची योग्य वेळ
3. धान्याचे पीक का वापरतात? दसरा हा शेतकऱ्यांचा सण मानला जातो. अश्विन महिन्यात खरीप पिकाची कापणी होते. त्यामुळे पहिल्या पिकाचे कणीस देवाला अर्पण करून दाराला बांधण्याची प्रथा आहे. यामुळे घरात धन-धान्याची बरकत होते.
4. कुरडूच्या फुलांचे महत्त्व: कुरडूची फुले ही पावित्र्याचे प्रतीक मानली जातात. ती दीर्घकाळ टिकतात आणि तोरणाचे सौंदर्य वाढवतात.या पारंपरिक पद्धतीमुळे तोरणाला धार्मिक महत्त्व प्राप्त होतेच, शिवाय ते दिसायलाही सुंदर असते.
या पारंपरिक पद्धतीमुळे तोरणाला धार्मिक महत्त्व प्राप्त होतेच, शिवाय ते दिसायलाही सुंदर असते. नैसर्गिक गोष्टींपासून बनवल्यामुळे प्रदूषण देखील टळते. त्यामुळे दसऱ्याला प्लास्टिकचे तोरण न लावता आंबा, झेंडू, धानाचे कणीस आणि कुरडूच्या फुलांपासून बनवलेले नैसर्गिक तोरण लावणे सर्वात शुभ मानले जाते.
(महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर) -
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.