असुरांचा संहार अन् अध्यात्माचा मार्ग! त्रिशूलपासून चक्रापर्यंत दुर्गा मातेच्या 10 शस्त्रांमागे दडलाय ‘हा’ गूढ अर्थ

श्री दुर्गा देवीचे रूप केवळ पराक्रम आणि शक्तीचे प्रतीक नसून ते मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या उच्च आध्यात्मिक मूल्यांचे अधिष्ठान मानले जाते. दुर्गेच्या हातात असणारी 10 विविध शस्त्रे ही केवळ असुरांच्या संहारासाठी नसून, त्यांच्यामागे एक सखोल संदेश दडलेला आहे.
असुरांचा संहार अन् अध्यात्माचा मार्ग! त्रिशूलपासून चक्रापर्यंत दुर्गा मातेच्या 10 शस्त्रांमागे दडलाय ‘हा’ गूढ अर्थ
Goddess Durga 10 weapons

नवरात्रीचा सण काही दिवसांवर आला आहे. सर्व घरांमध्ये दुर्गा मातेच्या आगमनाची तयारी सुरू आहे. श्री दुर्गा देवीचे रूप केवळ पराक्रम आणि शक्तीचे प्रतीक नसून ते मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या उच्च आध्यात्मिक मूल्यांचे अधिष्ठान मानले जाते. दुर्गेच्या हातात असणारी 10 विविध शस्त्रे ही केवळ असुरांच्या संहारासाठी नसून, त्यांच्यामागे एक सखोल संदेश दडलेला आहे.

त्रिशूल
मातेच्या हातातील ‘त्रिशूल’ हे मानवी जन्माशी निगडित सत्त्व, रज आणि तम या 3 गुणांचे तसेच सृष्टीच्या उत्पत्ति, स्थिती अन् लयाचे संतुलन राखण्याचे प्रतीक आहे.

चक्र
तर ‘चक्र’ हे सत्याचा मार्ग दाखवत मानवातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचे कार्य करते.

गदा
याचप्रमाणे, ‘गदा’ ही भक्तांना संकटाच्या वेळी आत्मबळ आणि धैर्य प्रदान करत दुष्टांच्या अहंकाराचा नायनाट करण्याचे सामर्थ्य दर्शवते.

खड्ग
देवीच्या हातातील ‘खड्ग’ (तलवार) हे भौतिक मोहमाया तोडून सत्याचे ज्ञान आणि विवेक बुद्धी जागृत करणारे शस्त्र मानले जाते.

‘पद्म’ (कमळ
‘पद्म’ (कमळ) हे चिखलात उगवूनही अलिप्त राहणाऱ्या फुलाप्रमाणे जगात राहून अध्यात्मिक शुद्धता टिकवून ठेवण्याचा संदेश देते.

हेही वाचा – पहिल्या दिवसापासून नवमीपर्यंत नवरात्रीचे 9 रंग कोणते? देवीची 9 रूपं, पूजेचं धार्मिक महत्त्व आणि रंगांची संपूर्ण यादी जाणून घ्या!

‘शंख’
‘शंख’ आणि त्याचा पवित्र ध्वनी मनातील काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर या विकारांचे उच्चाटन करून वातावरणात शुद्धता निर्माण करतो.

वज्र
तसेच ‘वज्र’ हे भक्तांच्या मनात ईश्वरचरणी अढळ श्रद्धा निर्माण करून कठीण काळात आत्मविश्वासाने उभे राहण्याची प्रेरणा देते.

धनुष्यबाण
जीवनात एकाग्रता, शिस्त आणि निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी देवीच्या हातातील ‘धनुष्य आणि बाण’ भक्तांना मार्गदर्शन करतात.

ढाल
‘ढाल’ ही कठीण प्रसंगात सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या साधकांना मातेचे सदैव छत्र आणि सुरक्षा कवच लाभत असल्याचे दर्शवते.

भाला
शेवटी ‘भाला’ किंवा शक्ती हे सत्य, धैर्य आणि निर्भयतेचे प्रतीक असून ते मानवाला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देते.

अशा प्रकारे ही 10 शस्त्रे मानवाला अंतर्गत शत्रूंचा पराभव करून मोक्षाच्या मार्गावर नेणारी दिव्य मार्गदर्शक ठरतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version