सार्वजनिक गणेशोत्सवासारखीच नवरात्रौत्सवाचीही रंजक गोष्ट; यंदाचे शताब्दी वर्ष, हे तुम्हाला माहिती होतं का?

महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी 1926 मध्ये दादर येथे केली.

सार्वजनिक गणेशोत्सवासारखीच नवरात्रौत्सवाचीही रंजक गोष्ट; यंदाचे शताब्दी वर्ष, हे तुम्हाला माहिती होतं का?
thackeray navratri festival

अवघ्या काही दिवसांवर नवरात्रौत्सव आला आहे. माताचं जागरण आणि गरब्याची धूक या नवरात्र उत्सवात पाहायला मिळते. गुजरातसह देशातील विविध राज्यांमध्ये नवरात्रौत्सव साजरा केला जातो. मात्र या सार्वजनिक उत्सवाची सुरूवात नेमकी कशी झाली, माहिती आहे का. जसं महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला, तसचं एका मराठी माणसानेच महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रौत्सवाची सुरूवात केली. तीही मुंबईतून. साधारण 1923-24 दरम्यानचा तो काळ. त्याकाळी सार्वजनिक स्वरूपात उत्सव म्हणून फक्त गणेशोत्सव साजरा केला जायचा. प्रबोधनकार ठाकरे, समाजसुधारक रावबहादूर सीताराम केशव बोले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने ‘लोकहितवादी’ या संघाच्या माध्यमातून 1926 मध्ये महाराष्ट्रातील पहिला ‘श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव’ दादरमध्ये काळं मैदान येथे सुरु करण्यात आला. प्लाझा सिनेमासमोर असलेले हे मैदान आता वीर कोतवाल उद्यान म्हणून परिचित आहे. काही वर्षांनंतर हा उत्सव दादर येथील खांडके चाळीत स्थलांतरित झाला. आजही दादर परिसरात खांडके चाळीत हा उत्सव तेवढ्याच उत्साहात आणि श्रद्धेने साजरा होतो. या माहितीचा संदर्भ प्रबोधनकार ठाकरे यांचे आत्मचरित्र ‘माझी जीवनगाथा’ मधून मिळतो.

हेही वाचा : शारदीय नवरात्रौत्सव 2026 : देवी दुर्गेला समर्पित नऊ दिवसांचा उत्सव! ‘या’ दिवशी होणार घटस्थापना; पाहा दसऱ्यापर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक

1926 च्या पूर्वी मुंबईत व महाराष्ट्रात कोठे प्रघात नसलेला श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा पहिला मान दादरने मिळवला. काळ्या मैदानावर 80 फूट लांब आणि 60 फूट रुंद विशाल मंडप उभारण्यात आला होता. या पहिल्या शिवभवानी नवरात्रोत्सवात भवानी मातेच्या मूर्तीसाठी राजा रवी वर्मांच्या कालीदेवीच्या तांडवनृत्याचा कट आऊट तयार करण्यात आला होता. शेजारी दोन्ही बाजूस पुरुषभर उंचीच्या दोन समई मांडण्यात आल्या होत्या. त्यावेळेस गिरगावातल्या मूगभाटातील वाजंत्री मंडळींनी सनई-चौघडे वाजवण्याची जबाबदारी घेतली होती. तर रावसाहेब बोले यांनी पहिल्या वाहिल्या शिवभवानी नवरात्रोत्सवात अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली होती.

आश्विनशुद्ध प्रतिपदेच्या दिनी आमदार सोळंकी यांच्या हस्ते भगवा ध्वज उभारण्यात आला होता. सर्व विधी दादरमधील विख्यात गुरुजी पालवेशास्त्री यांच्या मंत्रोच्चारांत पार पाडले. कविवर्य वसंत बिहर ऊर्फ जोशी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या जगदंबेच्या आरतीचे आबालवृद्धांनी सुरात गायन केले. भायखळा भाजी मंडईतील भाजी विक्रेत्या यमुनाबाई घोडेकर यांचे व्याख्यान तेव्हा गाजले होते. सुमारे तीन तास यमुनाबाई जीवनविषयक आपले विचार मांडत होत्या. पुढे तीन वर्षे 1929 पर्यंत हा उत्सव प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहिला. पुढे 1929 सालापासून 1940 सालापर्यंत हा नवरात्र उत्सव खांडके बिल्डींगच्या पटांगणात साजरा होऊ लागला. त्यानंतर दादरमधील खांडके चाळीतील रहिवाशांनी शिवभवानी नवरात्रोत्सवाची ही परंपरा आजवर जपली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number