Dussehra wishes 2026: सनातन संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेलेला विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा केला जातो. नवरात्रोत्सवाची सांगता करत वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून सत्याचा विजय कसा होतो हे जगाला दाखवून दिले, तर याच दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देऊन ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा’ अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जातात. शस्त्रपूजन, वाहन पूजन, दाराला झेंडूच्या फुलांची तोरणे बांधणे आणि रावण दहनाचा सोहळा यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो.
दसऱ्यानिमित्त सुंदर, आकर्षक आणि मराठमोळे शुभेच्छा संदेश
सण म्हटल्यानंतर आपल्या आप्तेष्टांना, मित्र-परिवाराला आणि नातेवाईकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून गोड शुभेच्छा देणे ओघाने आलेच. यंदाच्या 2026 मधील दसऱ्याच्या या पवित्र मुहूर्तावर अनेक नवीन कामांची सुरुवात केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर खरेदीही केली जाते. त्यामुळे तुमच्या प्रियजनांसोबत हा सण आणखीनच आनंददायी करण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पाठवता येतील असे सुंदर, आकर्षक आणि मराठमोळे शुभेच्छा संदेश तुम्ही नक्की शेअर करू शकता, जेणेकरून नात्यांमधील गोडवा आणि जिव्हाळा अधिक वृद्धिंगत होईल.
हेही वाचा – दसऱ्याला आपट्याची पाने ‘सोनं’ म्हणून का दिली जातात? जाणून घ्या, त्यामागची पौराणिक कथा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
सोनं घ्या, सोन्यासारखं राहा! आपट्याची पानं म्हणजे सोनं, नात्यांमध्ये प्रेम आणि मनामध्ये आपुलकी. आपणास व आपल्या परिवारास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाने केला वध रावणाचा
नकारात्मकतेला झुकवले
अधर्मावर धर्माचा विजय
हीच शिकवण देतो दसरा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता
आज दसऱ्याच्या शुभ दिनी दूर होवो
प्रभू श्रीरामांची कृपा तुम्हावर राहो
विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!
दसरा घेऊन येवो सुखाची पहाट, यशाची लाभो तुम्हाला नवी वाट! दुःखाचे ढग दूर सरू देत, आनंदाचे क्षण आयुष्यात भरू देत. शुभ दसरा!
झेंडुची फुले, आपट्याची पाने
घेऊन आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख-समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आंब्याच्या पानांची केली कमान,
अंगणात काढली रांगोळी छान,
अश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा
आपट्याची पाने देऊन करुयात साजरा…
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
सत्याचा असत्यावर विजय होवो आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदो. विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!
सोन्याची पाने
आपट्याला महत्व
सोन्यासारख्या माणसांना
सोनं देऊन कायम जपलं
विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!
दाराला बांधले तोरण झेंडूचे
दारात घातली रांगोळी
घरात केले शस्त्रपूजन
बेत श्रीखंड पुरीचा झाला
असा हा सण दसऱ्याचा
आनंदाने आम्ही साजरा केला
विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
जल्लोष विजयाचा..
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा.
दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा
वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजयाचा
महान सण विजयादशमीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
आज तुमची इच्छापूर्ती होवो
आयुष्यातील अंधार दूर होऊन
सोन्याची किरणे वाटेत येवो
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा…!
आपट्याच्या पानांनी
आपलेसे करा आज
शत्रूंनाही,वाईटावर
चांगल्याचा विजय होतो
दाखवा त्यांना दसऱ्याच्या दिनी
विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!
ज्ञानाची पूजा आणि शौर्याचा सन्मान! तुमच्या ध्येयाच्या वाटेतील प्रत्येक ‘वाईट शक्ती’चा नाश होवो! विजयादशमीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा!
विजयादशमीच्या या शुभ दिवशी, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर विजय प्राप्त करण्याची शक्ती मिळो! तुमचे भविष्य तेजस्वी असो. शुभकामना!
आंब्याच्या पानांच्या तोरणांनी दरवाजा सजला
झेंडुच्या फुलांनी दसऱ्याचा सण बहरला…
सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार
हा आनंदाचा क्षण करा आनंदाने साकार
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी
सोन्यासारख्या लोकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रभू श्रीरामासारखे होण्यासाठी
धर्माच्या मार्गावर चालत रहा
दसऱ्याच्या दिनी शपथ घेऊन
वाईट प्रवृतींपासून दूर रहा
दसऱ्याच्या खूप शुभेच्छा…!
वाईटावर चांगल्याचा विजय होवो
असत्यावर सत्याचा विजय होवो
अंधारावर प्रकाशाचा विजय होवो
नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय होवो
विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!
निसर्गाचं दान आपट्याचं पान, त्याला सोन्याचा मान, तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं. आपणास व आपल्या परिवारास, विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!
तुमच्या घरात सदैव सुख-समृद्धीचा वास असो, आरोग्य चांगले राहो! यंदाचा दसरा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि नवीन संधी घेऊन येणारा असो. शुभ विजयादशमी!
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा. विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनातील रावणाचा अंत करण्यासाठी
मनातील नकारात्मकता संपवावी लागते
केवळ शरीर शुद्ध करून चालत नाही
अंतरात्म्याची पावित्र्यता महत्वाची असते
विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!
प्रभू रामाची कृपा तुमच्यावर सदैव राहो
तुमचे घर नेहमी धन-धान्याने भरलेले असो
विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!