नवरात्रीचे नऊ दिवस घट आणि अखंड दिव्याला विशेष महत्त्व! ‘या’ पवित्र परंपरेमागचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

येत्या 11 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार असून या 9 दिवसांत स्त्री शक्तीचा जागर केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत आदिशक्ती देवी दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते.

नवरात्रीचे नऊ दिवस घट आणि अखंड दिव्याला विशेष महत्त्व! ‘या’ पवित्र परंपरेमागचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या
Navratri 2026

येत्या 11 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार असून या 9 दिवसांत स्त्री शक्तीचा जागर केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत आदिशक्ती देवी दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. या काळात भक्त उपवास करतात, देवीची आराधना करतात आणि घरामध्ये सुख, समृद्धी, शांती आणि आनंद नांदावा, यासाठी प्रार्थना करतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून उत्सवाची सुरुवात केली जाते.

हिंदू धार्मिक परंपरेमध्ये घटस्थापनेला विशेष महत्त्व असून, हा विधी देवीच्या शक्तीचे, समृद्धीचे आणि शुभारंभाचे प्रतीक मानला जातो. नवरात्रीच्या काळात अनेक घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवण्याची परंपरा आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत अखंड ज्योत तेवत ठेवून देवी दुर्गेची आराधना केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, दिव्याची ज्योत ही ज्ञान, पवित्रता, श्रद्धा आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे.

हेही वाचा- घटस्थापनेच्यावेळी कलशात 1 रुपयाचं नाणं का ठेवतात? जाणून घ्या धार्मिक कारण

नवरात्रीमध्ये घटस्थापना आणि अखंड ज्योत या दोन्ही विधींना विशेष महत्त्व दिले जाते. घट हा जीवन, समृद्धी आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानला जातो. कलशाच्या मुखात भगवान विष्णू, कंठात रुद्र आणि मूळ भागात ब्रह्मदेवाचा वास असतो, तर मध्यभागी सर्व देवी शक्तीचा वास असतो अशी मान्यता आहे. घटस्थापनेच्या वेळी स्वच्छ जागेवर माती ठेवून त्यामध्ये सात प्रकारची धान्य पेरली जातात आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापित केला जातो. त्यानंतर नऊ दिवसांत धान्याची उगवण किती हिरवागार होते, यावरून येणाच्या वर्षातील शेती आणि समूद्धीचा शुभ संकेत मानला जातो.

तर दुसरीकडे देवीच्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा किंवा उजव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवण्याची परंपरा आहे. यालाच अखंड दिवा म्हणतात. जशी ज्योत अखंड वरच्या दिशेने जळते, तसाच माणसाचा अध्यात्मातील प्रवासही सतत उच्च पातळीकडे होत राहावा, हा त्यामागील संदेश आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत देवीची पूजा करताना घटस्थापना आणि अखंड ज्योतीचे महत्त्व समजून घेणे, तसेच आपल्या कुटुंबातील परंपरा श्रद्धेने आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन जपणे महत्त्वाचे ठरते.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number