नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. काही दिवसांतच देवी आईचे मोठ्या थाटामाटात आगमन होईल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीची मनोभावे पूजा केली जाते.मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, घटस्थापना करताना कलशात पाणी, आंब्याची पाने, नारळासोबत 1 रुपयाचं नाणं का ठेवलं जातं? अनेकजण फक्त परंपरा म्हणून हे करतात, पण यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक अशी 3 मोठी कारणे आहेत.
1. लक्ष्मी देवीचे प्रतीक (धन आणि समृद्धी):
शास्त्रानुसार कलशातील पाण्याचा संबंध वरुण देव आणि विष्णू भगवानांशी असतो. चांदीचे किंवा तांब्याचे नाणे (किंवा सामान्य 1 रुपयाचं नाणे) हे महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. कलशात नाणे टाकल्याने घरात सुख, समृद्धी आणि संपत्तीचे आगमन होते अशी धार्मिक मान्यता आहे
2. समृद्धी आणि स्थैर्य:
1 रुपयाचं नाणं हे समृद्धीचे संकेत आहे. नवरात्रीच्या 9 दिवस देवीची पूजा करताना कलशात ठेवलेले नाणे हे आपल्या कमाईला स्थिरता देते आणि वास्तुदोष दूर करते, असे मानले जाते.
हेही वाचा – नवरात्रीत 9 दिवस 9 लूक! हेवी मेकअपला करा बाय-बाय, ‘ही’ आहे नॅचरल मेकअपची ट्रेंडिंग गाईड
3. शुभ संकल्पाचा मान:
पूर्वीच्या काळी राजे-महाराजे कलशात सोन्याचे नाणे ठेवत असत. काळानुसार त्याची जागा 1 रुपयाने घेतली. हे नाणे म्हणजे देवीला दिलेली देणगी किंवा आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी केलेला संकल्प मानला जातो.
4. पाण्याची शुद्धता (शास्त्रीय कारण):
जुन्या काळात कलशामध्ये तांब्याचे किंवा चांदीचे नाणे टाकले जायचे. तांबे आणि चांदी या धातूंमध्ये पाणी शुद्ध ठेवण्याचे आणि जंतूंचा नाश करण्याचे गुणधर्म असतात. नऊ दिवस कलशातील पाणी ताजे आणि पवित्र राहावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आजच्या काळातही तीच परंपरा म्हणून १ रुपयाचे नाणे टाकले जाते.
मग या नाण्याचे काय करायचे?
नवरात्री संपल्यानंतर हे 1 रुपयाचे नाणे खर्च न करता तिजोरीत किंवा देव्हाऱ्यात ठेवा; धार्मिक मान्यतेनुसार घरात वर्षभर सुख-समृद्धी राहते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.