Wednesday, December 11, 2024 10:15:26 PM

नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर

नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर

पुणे, ११ मे २०२४, प्रतिनिधी : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजपाचे दिग्गज नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. मुरलीधर मुलांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यात सभा घेणार आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार मुरलीधर मोहळ यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी शनिवारी पुण्यात येणार आहेत. मोहळ यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी जाहीर सभा घेणार आहेत. शनिवारी, ११ मे रोजी सकाळी १०:३० वाजता पुण्यातील नातूबाग येथे नितीन गडकरी यांची सभा होणार आहे. या सांगता सभेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.
पुणे, मावळ, शिरूर या मतदारसंघासाठी १३ मे, २०२४ रोजी चौथ्या टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी उरले अवघे काही तास उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सभांचा धडाका सुरु आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo