‘तेच माझे खरे नेते, त्यांचेच आदेश पाळणार…’; अभिजीत दीपकेंच्या पोस्टने खळबळ, नेमकं काय म्हणाले?

CJP नेत्यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर सीजेपी प्रमुख अभिजीत दीपके यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधत आनंद व्यक्त केला.

‘तेच माझे खरे नेते, त्यांचेच आदेश पाळणार…’; अभिजीत दीपकेंच्या पोस्टने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक आंदोलन उभारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीला (CJP) मोठा न्यायालयीन दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात लागू असलेल्या बंदीचे उल्लंघन करत निदर्शने केल्याप्रकरणी अटकेत असलेले सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना अखेर 8 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयातून जामिनावर सुटका होताच या दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा ‘ज्ञानू मस्ट गो’ अशी आक्रमक घोषणाबाजी करत आपले आंदोलन मागे हटणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या घडामोडीनंतर सीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हेही वाचा  – ‘आमचे हात बांधलेले नाहीत! गरज पडल्यास न्यायालय निवडणुकांमध्येही लक्ष घालू शकते’; सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सज्जड इशारा

अभिजीत दीपके यांची सोशल मीडियावर भावूक पोस्ट

दरम्यान, CJP नेत्यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर सीजेपी प्रमुख अभिजीत दीपके यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधत आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करत या दोन्ही सहसंयोजकांचे कौतुक केले. दीपके म्हणाले की, या दोघांचे धैर्य आणि नेतृत्व माझ्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असून, तेच माझे खरे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार काम करण्यात मला नेहमीच अभिमान वाटेल, असे सांगत त्यांनी यापुढील राजकीय लढ्यात या दोन्ही सहसंयोजकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असेल हे स्पष्ट केले आहे.

रोहित शर्माच्या ‘गार्डन’ संदर्भाचा वापर

आपल्या पोस्टमध्ये अभिजीत दीपके यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या गाजलेल्या संवादाचा मजेशीर संदर्भ वापरला आहे. “यापुढे मला सोबत न घेता गार्डनमध्ये एकट्याने फिरायला जायचे नाही,” अशी टोलेबाजी करत त्यांनी दोन्ही नेत्यांना यापुढील प्रत्येक आंदोलनात आणि संघर्षात मी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा असेन, असा विश्वास दिला. जंतर-मंतरच्या गेटवरून उडी मारून तिरंगा फडकवणाऱ्या या सहसंयोजकांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा असून, आगामी काळात मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number