‘काल सोडलं असतं तर आजीचं अंतिम दर्शन घेता आलं असतं’ – अभिजित दीपकेच्या आई-वडिलांचा दिल्ली पोलिसांवर संताप

नवी दिल्लीत CJP आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या आंदोलकांची आज सुटका करण्यात आली.

हिंगोली : नवी दिल्लीत CJP आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या आंदोलकांची आज सुटका करण्यात आली. मात्र या सुटकेला एका दु:खद घटनेची किनार आहे. या आंदोलनाचे मुख्य प्रवक्ते अभिजित दीपके यांना दिल्ली विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याचदरम्यान त्यांच्या आजीचे निधन झाल्याची दुःखद बातमी कुटुंबियांना समजली.

दीपके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आजीच्या अंत्यदर्शनासाठी अभिजितला सोडावे, अशी कळकळीची विनंती त्याच्या आई-वडिलांनी दिल्ली पोलिसांकडे वारंवार केली होती. मात्र पोलिसांनी त्यांची विनंती फेटाळून लावली.

आज अखेर अभिजित दीपके आणि त्याच्या सहकाऱ्यांची सुटका करण्यात आली असून तो हिंगोलीकडे रवाना होत आहे. मात्र तोपर्यंत आजीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आहेत. त्यामुळे अभिजितला आजीचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही.

माध्यमांशी बोलताना अभिजितच्या आई-वडिलांनी तीव्र रोष व्यक्त केला. “आज सोडून काय उपयोग? काल सोडलं असतं तर त्याला आजीचं अंतिम दर्शन घेता आलं असतं,” अशी व्यथा त्यांनी मांडली. अभिजितचे वडील दिल्ली पोलिसांकडे हात जोडून विनवणी करत होते, असेही त्यांनी सांगितले.

अभिजित दीपके आज हिंगोलीत पोहोचून कुटुंबीयांची भेट घेणार आहे, मात्र आजीला शेवटचे पाहता न आल्याची खंत कुटुंबीयांच्या मनात कायम राहणार आहे.

हेही वाचा – ‘ज्ञानेश कुमार यांच्याकडे कोणती गुप्त माहितीये ज्यामुळे भाजप त्यांना वाचवतयं?’; सौरव दास यांचा सवाल

 

 

 

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number