‘ठोस तपास का होत नाही, काही दबाव आहे का?’; आदित्य ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूप्रकरणी तपासासाठी आक्रमक

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
Aditya thackrey
Aditya thackrey

 ठाणे :  ठाण्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर शिंदे सेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे सेनेने केली आहे. जवळपास एक महिना उलटला तरीही पूर्णकरांच्या हत्येप्रकरणी ठोस तपास नाही आणि मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेसाठी पोलिसांवर काही दबाव आहे का, असा सवाल ठाकरे सेनेकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत ठोस तपास का होत नाही, काही दबाव आहे का, अशी विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : प्रशासकीय वर्तुळात खळबळ! एकाच वेळी 12 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

पुढे पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थित केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, राम हा स्वतः एकटा पालकमंत्री, उपमुख्यमंत्री फेकनाथ शिंदे यांना भेटायला गेला होता. मिंधे खूप घाबरत आहेत. या मुलाला पोलीस पुढे करतात. यासाठीचा जनआक्रोश आपल्याला ठाण्यात दिसत आहे. CCTV फुटेजमध्ये जे काही आहे ते अटक करण्यासाठी पुरेसे आहे. पळून गेला तुम्ही, नालायक लोकं आहात तुम्ही. पोलिसांच्या मागे लपायचे?, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. गृहमंत्री पक्ष फोडण्यात, झाडं तोडण्यात, जंगल उद्ध्वस्त करण्यात व्यस्त आहेत. मिंधेंमध्ये जर हिंमत असती तर या रामला भेटले असते. हातात थोडी तरी सत्ता आली की कुत्र्याला वाटतं मी शेर आहे. हत्या का झाली हे स्पष्ट होण्यासाठी मीनाक्षी शिंदे, राजा शिंदे यांना अटक करा, मग हत्या का झाली हे सुद्धा स्पष्ट होईल. या दोन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक करावीच लागेल, असे ठाणेकरांचे म्हणणे आहे, असंही ठाकरेंनी नमूद केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version