शिवसेना नगरसेवकाला अटक, सागर भारुकांची हॉटेलमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

अकोल्याच्या महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे गटनेते नगरसेवक सागर भारुका यांना सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे.

शिवसेना नगरसेवकाला अटक, सागर भारुकांची हॉटेलमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
Sagar Bharuka

सुरेंद्र अकोडे, प्रतिनिधी 

अकोला : अकोल्याच्या महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे गटनेते नगरसेवक सागर भारुका यांना सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे. यादरम्यान, शनिवारी 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री बस स्टँड परिसरातील एका हॉटेलमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ आता वायरल झाला आहे. तसेच हॉटेलमध्ये भारुका आणि कर्मचारी शोएब अख्तर यांच्यात वाद झाल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. शिंदे शिवसेनेचे नगरसेवक यावेळी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचाही व्हिडीओ दिसून येत आहे. हॉटेल कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून शिंदे शिवसेनेचे नगरसेवक भारुका यांच्यावर खंडणीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत हॉटेल मालकाकडून 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा उल्लेख आहे. मात्र व्हिडिओमध्ये खंडणी मागितली असल्याचे दिसून येत नाही.

हेही वाचा : सोलापुरात मोठी खळबळ! ठाकरे गटाच्या उपनेत्यावर पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं कारण काय?

मात्र, नगरसेवक भारुका यांनी सर्व आरोप फेटाळून लावत राजकीय दबाव आणि द्वेषातून आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा केला आहे. थेट जनतेच्या प्रश्नासाठी भांडणाऱ्या खऱ्या शिवसैनिकाला जाणीवपूर्वक आपल्याला फसवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.. यादरम्यान पोलिसांकडून हॉटेल मालक, कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला असून नगरसेवक सागर भारुका यांना अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात वैद्यकीय तपासणीनंतर आज सकाळी सोमवारी हजर करण्यापूर्वी नगरसेवक सागर भारूका हे रुग्णालयातच भरती झाले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number