ठाणे : उबाठा गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी शुक्रवारी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात पार पडलेल्या या पक्ष सोहळ्यावेळी शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख तथा युवासेना सरचिटणीस राहुल कनाल आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री म्हणाले की गेली अनेक वर्ष दुबे यांना शिवसेनेते काम करताना पाहिले आहे. राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडणाऱ्या या कार्यकर्त्याने आज मूळ शिवसेनेत प्रवेश केला. आनंद दुबे यांच्यासह गुलाबचंद मौर्य, सुनील चौबे, ब्रीजेश मोर्य, दशरत प्रजापती, प्रवीण दुबे, धनंजय गुप्ता यांच्यासह अनेकांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. ते पुढे म्हणाले की, अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या, पायाभूत विकास प्रकल्प पूर्ण केले. महाराष्ट्राला अडीच वर्षात पुढे नेण्याचे काम केले. महाराष्ट्राला विकासाकडे आणि प्रगतीकडे घेऊन गेलो. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खूप सहकार्य लाभले. या सर्व कार्यकाळात आम्ही महाराष्ट्राला प्रगतीपथाकडे घेऊन गेलो. आज महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे, असे ते म्हणाले. या कामावर प्रभावित होऊन विविध पक्षातील लोक आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे ते म्हणाले.
हेही वाचा : CJP च्या आंदोलनावर माजी सरन्यायाधीशांची पहिली प्रतिक्रिया समोर; नेमकं काय म्हणाले?