‘भीमाशंकरच्या जंगलाला प्रकल्पामुळे कोणताही धोका नाही…’; मुख्यमंत्र्यांनी फेटाळले विरोधकांचे सर्व आरोप

या ऊर्जा प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या जंगलाला किंवा पर्यावरणाला कसलाही धोका पोहोचणार नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली आहे.
‘भीमाशंकरच्या जंगलाला प्रकल्पामुळे कोणताही धोका नाही…’; मुख्यमंत्र्यांनी फेटाळले विरोधकांचे सर्व आरोप
Devendra Fadnavis On Karjat project controversy

महाराष्ट्रातील कर्जत भागात प्रस्तावित असलेल्या एका ऊर्जा प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, हा प्रकल्प वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीमुळे भीमाशंकरच्या संरक्षित आणि समृद्ध जंगलाला मोठा धोका निर्माण होईल, असा दावा करत विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या ऊर्जा प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या जंगलाला किंवा पर्यावरणाला कसलाही धोका पोहोचणार नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली आहे.

हेही वाचा – नर्मदा नदीपात्रात आढळली 300 हून अधिक मतदार ओळखपत्रे! काँग्रेस आक्रमक, उच्चस्तरीय चौकशी सुरू

विरोधकांचा आक्रमक सवाल

ऊर्जा प्रकल्पासाठी होत असलेल्या कथित वृक्षतोडीवरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत म्हटले की, “शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील एखादे झाड तोडायचे असल्यास 17 ठिकाणी अर्ज करावे लागतात आणि सत्र प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. असे असताना या प्रकल्पासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करताना कोणाची परवानगी घेण्यात आली? ही वृक्षतोड पूर्णपणे बेकायदेशीर असून आमचा याला ठाम विरोध आहे.” ही वृक्षतोड तात्काळ थांबवण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता करत असल्याचे सांगत, अशा कारभारावरून सरकारचे दिवस भरत आल्याची टीकाही विरोधी पक्षांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

विरोधाच्या आणि राजकीय आरोपांच्या या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, हा ऊर्जा प्रकल्प भीमाशंकरच्या मुख्य जंगलापासून सुमारे 16 किलोमीटर दूर आहे, तर प्रसिद्ध भीमाशंकर मंदिरापासून त्याचे अंतर जवळपास 20 किलोमीटर आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे जंगलाची किंवा वन्यजीवांची कोणतीही हानी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. “हा प्रकल्प महाराष्ट्रात रोजगार निर्माण करणारा असून, निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर पहिला अधिकार महाराष्ट्राचाच आहे,” असे सांगत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version