‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका! पुढील 5 दिवस विदर्भ, मराठवाड्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता

राज्यात सध्या ऑक्टोबरच्या शेवटी 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमानामुळे कडक ऊन आणि उकाडा जाणवत असतानाच आता पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका! पुढील 5 दिवस विदर्भ, मराठवाड्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता
Maharashtra rain alert

Maharashtra Weather Forecast: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामानात आगामी 5 दिवसांत मोठा बदल होणार आहे. राज्यात सध्या ऑक्टोबरच्या शेवटी 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमानामुळे कडक ऊन आणि उकाडा जाणवत असतानाच आता पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

‘अर्णब’ चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीवर धडकणार

बंगालच्या उपसागरातील हे चक्रीवादळ विशाखापट्टणमपासून सुमारे 650 किलोमीटर आणि गोपालपूरपासून 610 किलोमीटर अंतरावर केंद्रित आहे. 27 ऑक्टोबर रोजी याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होईल. त्यानंतर 28 ऑक्टोबरला हे वादळ ताशी 115 ते 125 किलोमीटर (कमाल झोत 140 किमी) वेगाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पुढील 5 दिवस हवामान ढगाळ राहील.

बुधवार आणि गुरुवारी विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर

मंगळवारी चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोलीत पावसाला सुरुवात होईल. बुधवारी गडचिरोलीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागपूर, गोंदिया, वर्धा, नांदेड, कोल्हापूर घाटमाथा आणि मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, सातारा आणि कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या सरी बरसतील. गुरुवारी गोंदिया, अमरावती, भंडारा, अमरावती, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात पावसाची हजेरी राहील.

हेही वाचा – यंदा आनंदाचा शिधा नाही? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिंदेसेनेचा मोठा निर्णय; 10 हजार…

हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान, शुक्रवारी अहिल्यानगर आणि नाशिक घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. त्यासोबतच धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, सांगली, बीड आणि रायगड जिल्ह्यात हलक्या सरींची नोंद होऊ शकते. हवामानातील या बदलांमुळे शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः विजा चमकत असताना उघड्यावर किंवा झाडांखाली थांबणे टाळावे, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number