“मी शेतकऱ्यांवर बोललो नाही” शेतकरी मृत्यूप्रकरणी वादग्रस्त विधानावरून संजय गायकवाडांचे घुमजाव

बुलढाणा विधानसभेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांना घेऊन बेताल वक्तव्य केल्यानंतर आज केलेल्या विधानावरून घुमजाव केला आहे.
Sanjay Gaikwad
Sanjay Gaikwad

आमदार संजय गायकवाड यांनी शेतकरी मृत्यूप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केले होते. आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या कथित असंवेदनशील वक्तव्याचा राज्यभरात ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. बुलढाणा विधानसभेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांना घेऊन बेताल वक्तव्य केल्यानंतर आज केलेल्या विधानावरून घुमजाव केला आहे.

मी शेतकऱ्यांबद्दल असं बोललोच नाही असं म्हणत बुलढाणा शहरात व्यसनाधीनतेने होत असलेल्या युवकांच्या आत्महत्यांबाबत बोललो असल्याचं आमदार संजय गायकवाड म्हणालेत. शेतकऱ्यांप्रती वादग्रस्त विधान केल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्यानंतर आमदार महोदयांना उपरती आणि ते शेतकऱ्यांची माफी मागतील अशी अपेक्षा असताना आमदार गायकवाड यांनी आपल्या विधानावरून घूमजाव करून शेतकऱ्यांचा त्यांना काही एक घेणं देणं नसल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

हेही वाचा- ‘ठोस तपास का होत नाही, काही दबाव आहे का?’; आदित्य ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूप्रकरणी तपासासाठी आक्रमक

यावेळी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल स्पष्टीकरण समोर आले असून यात ते म्हणाले की, “माझ्या मतदारसंघात 25 ते 30 वयोगटातील युवक नशा सेवन करतात आणि मग जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक प्रेमभंग झाल्यातून टोकाचं पाऊल उचलतात. या सगळ्यांमध्ये युवकांनी जीवन संपवल्यानंतर कुटुंबीयांवर मोठा संकट येते. या सर्व उद्देशाने मी बोललो आहे मी शेतकऱ्यांवर बोललो नाही.”

शेतकरी मृत्यूप्रकरणी संजय गायकवाडांच ते वक्तव्य
दुष्काळग्रस्त परिस्थितीला कंटाळून जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्यांवर आमदार संजय गायकवाड यांनी अजब विधान केले आहे. “जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्यांच्या मयतावर कोणी जाऊ नये, जेव्हा शेतकऱ्याच्या मयताला कोणी जाणार नाही आणि त्यांची बॉडी जनावरे खातील तेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आणि ते आत्महत्या करणार नाही.” वाढत्या शेतकरी तणावावर संतापातून आमदार संजय गायकवाड यांचे विधान समोर आल आहे. शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाची साथ द्यावी असं मध्येच सोडून जाऊ नये असंही ते यावेळी म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version