मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड; ठाकरे-फडणवीसांमध्ये कार्यक्रमाआधी बंद दाराआड चर्चा

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक अत्यंत दुर्मिळ आणि लक्षवेधी घडामोड पाहायला मिळाली आहे. ठाकरे आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politics

ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज एकाच मंचावर असल्याचे पाहायला मिळत आहे.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात सायंकाळी सात वाजता हा सोहळा पार पडत आहे. यावेळी राजकारणात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे हे तीन नेते त्यांच्या भाषणांमध्ये राजकीय टोलेबाजी करणार की कलेच्या कौतुकाचे सूर उमटणार, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा- “मी शेतकऱ्यांवर बोललो नाही” शेतकरी मृत्यूप्रकरणी वादग्रस्त विधानावरून संजय गायकवाडांचे घुमजाव

मात्र त्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक अत्यंत दुर्मिळ आणि लक्षवेधी घडामोड पाहायला मिळाली आहे. ठाकरे आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे. पुस्तक प्रकाशनाआधी नेत्यांमध्ये झालेली चर्चा राजकीय वर्तूळात केंद्रबिंदू ठरली आहे.

नुकतात विधान परिषद निवडणुकीच्या निकाल लागला, या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर या तीन नेत्यांच्या भेटीला राजकीय वर्तूळात महत्त्व आले आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली? याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version