मुंबई: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. आजपर्यंत त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. अशातच, त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तसेच, त्यांच्या या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.
'पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती विरोध करत नाहीत. मात्र मुस्लिमांनी रस्त्यावर नमाज पठण केल्यावर त्यांच्या विरोधात तक्रार केली जाते', असं विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी केले आहे.
हेही वाचा: 'शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी...' - मंत्री गुलाबराव पाटील
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
'अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे. कारण त्यांना असं वाटतं की, वादग्रस्त विधानं केली की, प्रसिद्धी जास्त मिळते. त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही. त्यामुळे मी अशा फालतू गोष्टीला उत्तर देणार नाही', अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा: अबू आजमींच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमोल मिटकरी आणि एकनाथ खडसे काय म्हणाले?
काय म्हणाले अबू आझमी?
'पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. रस्त्यावर हिंदूंचे अनेक सण साजरे केले जातात. हिंदू सणांविरोधात कोणतीही मुस्लिम व्यक्ती तक्रार करत नाही. मग जर मुस्लिम व्यक्तीने दहा मिनिटांसाठी रस्त्यावर नमाज पठण केलं तर त्यांच्याविरोधात तक्रार केली जाते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्यांविरोधात पासपोर्ट रद्द करण्याची धमकी दिली आहे', असं अबू आझमी म्हणाले.