दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पुन्हा अटक, नेमकं काय घडलं?

कॉककरोच जनता पार्टीचे (CJP) सदस्य आशुतोष रांका व सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्या परिसरात निदर्शने किंवा सभांना परवानगी नसतानाही हे दोन्ही नेते जंतरमंतरवर पोहोचले होते, त्यानंतर ही प्रशासकीय कारवाई करण्यात आली.

10 ऑक्टोबरला झालेल्या आंदोलनात CJP नेते अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कोठडीत घेतले होते. त्यानंतर, दिल्ली विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना 1 वर्षासाठी शांतता आणि चांगले वर्तन राखण्याच्या अटीवर 50,000 रुपयांच्या जामीनपत्रावर जामिनावर सोडले होते.

जामिनाच्या अटी आणि लागू असलेले निर्बंध असूनही जंतरमंतर येथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्या दोन नेत्यांना पुन्हा ताब्यात घेतले आहे. परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा – सुप्रीम कोर्टात इंडिया आघाडीचा डाव फसला?, ‘या’ त्रुटींमुळे याचिका अडकली

अशातच CJP चे अभिजित दीपके हे हिंगोलीत त्यांच्या गावी असताना दीपके यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version