एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसची ड्रोनद्वारे रेकी? जळगावात खळबळ; मोठ्या षडयंत्राचा आरोप

एकनाथ खडसे यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील त्यांच्या फार्महाऊस आणि निवासस्थानाची ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी (रेकी) करण्यात आल्याचा गंभीर संशय स्वतः एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसची ड्रोनद्वारे रेकी? जळगावात खळबळ; मोठ्या षडयंत्राचा आरोप
Eknath Khadse Muktainagar house recce

महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील त्यांच्या फार्महाऊस आणि निवासस्थानाची ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी (रेकी) करण्यात आल्याचा गंभीर संशय स्वतः एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. 28 सप्टेंबर रोजी रात्री 8:00 ते 8:15 या 15 मिनिटांच्या कालावधीत एक अज्ञात ड्रोन त्यांच्या फार्महाऊसच्या परिसरात संशयास्पदरित्या घिरट्या घालत होते. तेथील सुरक्षारक्षकाने या संपूर्ण घटनेचे आणि फिरणाऱ्या ड्रोनचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले असून, खडसे यांनी यासंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली आहे.

“माझ्याविरोधात मोठे राजकीय षडयंत्र”; विशेष पथकाद्वारे चौकशीची मागणी

या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “माझ्याविरोधात अत्यंत मोठे आणि भयंकर षडयंत्र रचले जात आहे. अशा प्रकारे रात्रीच्या वेळी बराच वेळ एखाद्या नेत्याच्या घरावर ड्रोन फिरणे अत्यंत संशयास्पद आहे,” असे ते म्हणाले. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगत असले, तरी हा विषय स्थानिक पोलिसांच्या अखत्यारीबाहेरचा वाटतो. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष चौकशी पथकाद्वारे याची सखोल चौकशी करावी आणि यामागील सूत्रधाराचा शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी खडसे यांनी केली आहे.

हेही वाचा – ‘आजोबांच्या जीवावर उड्या मारणारा उपटसुंब्या…’; राजेंद्र राऊतांचा रोहित पवारांवर हल्लाबोल

फोन टॅपिंग आणि चोरीच्या जुन्या घटनांचा दिला संदर्भ; प्रशासनावर निशाणा

आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करताना खडसे यांनी भूतकाळातील घटनांची आठवण करून दिली. यापूर्वी तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी कोणताही कायदेशीर परवाना नसताना तब्बल 65 दिवस आपला फोन टॅप केला होता, असा पुनरुच्चार त्यांनी केला. फोन टॅपिंगबाबत तक्रार करूनही पुढे काय कारवाई झाली, याचा खुलासा अजून झालेला नाही. याशिवाय काही काळापूर्वी त्यांच्या निवासस्थानी चोरीची घटनाही घडली होती. या सर्व प्रकारांतून आपला सातत्याने मानसिक छळ केला जात असल्याचा घणाघाती आरोप करत, राजकीय सूडबुद्धीतून हा प्रकार घडत आहे का, याचा शोध पोलिसांनी घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number