ऑपरेशन 3.0 ची तारीख सांगणार नाही, पण…; शिंदेंच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण

आज दसरा मेळाव्यात बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या नेहमीच्या प्रश्नावर मिश्किल असे उत्तर दिले. पत्रकार नेहमी मला विचारतात. ऑपरेशन एक झालं, ऑपरेशन दोनही झालं, आता ऑपरेशन 3.0 कधी?,यावर शिंदे म्हणाले

ऑपरेशन 3.0 ची तारीख सांगणार नाही, पण…; शिंदेंच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
Eknath Shinde

आज दसरा मेळाव्यात बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या नेहमीच्या प्रश्नावर मिश्किल असे उत्तर दिले. पत्रकार नेहमी मला विचारतात. ऑपरेशन एक झालं, ऑपरेशन दोनही झालं, आता ऑपरेशन 3.0 कधी?,यावर शिंदे म्हणाले, आम्ही सांगून काही करत नाही. डॉक्टर तारीख देतात, आम्ही तारीख देत नाही. आम्ही थेट ऑपरनेशनच करुन टाकतो.

नो डेट, ऑपरेशन थेट. शिंदे यांच्या या वक्तव्याने मेळाव्यात जोरदार जल्लोष झाला. कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांतं स्वागतही केलं. राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन 3.0 ची जोरदार चर्चा सुरु आहे. दोन मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर आता तिसरं ऑपरेशन कधी होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र शिंदे यांनी कोणतीही तारीख न देता, वेळ आल्यावर थेट कृती केली जाईल, असा सूचक इशारा दिला आहे.

 

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number