Wednesday, November 19, 2025 01:21:44 PM

Shivsena vs Sadavarte: एसटी बँकेत बैठकीदरम्यान राडा, सदावर्ते आणि शिंदे गटात तुफान हाणामारी

एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाला आहे. शिंदेंची शिवसेना आणि सदावर्ते गट यांच्यात मारहाण झाल्याचे समोर आले आहे.

shivsena vs sadavarte एसटी बँकेत बैठकीदरम्यान राडा  सदावर्ते आणि शिंदे गटात तुफान हाणामारी

मुंबई: एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाला आहे. शिंदेंची शिवसेना आणि सदावर्ते गट यांच्यात मारहाण झाल्याचे समोर आले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत अपमानास्पद भाषा वापरल्याने आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हाणामारी

बैठकीतील हाणामारीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक संचालक उभा राहून बोलत असल्याचे दिसत आहे. तो म्हणत आहे की, "ही संचालक मंडळाची बैठक आहे. याचे कोणीही रेकॉर्डिंग करू नये, याचा आऊटपूट बाहेर जाता कामा नये, असे वर्तन कुणीही करू नये." परंतु यानंतरच बैठकीत राडा सुरु होतो. संचालक एकमेकांकडे हातवारे करून भांडू लागतात. तसेच एकमेकांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकतात. या घटनेत एकनाथ शिंदे-आनंदराव अडसूळ संघटनेचे 4 ते 5 संचालक जखमी झाले असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Guardian Minister of Gondia: बाबासाहेब पाटलांनी दिला गोंदियाच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा, इंद्रनील नाईक नवे पालकमंत्री

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बँकेच्या संचालक मंडळाची आज सकाळी बैठक सुरु होती. या बैठकीला सदावर्ते यांच्या पॅनलचे सर्व संचालक आणि शिवसेना अडसूळ पॅनलचे संचालकही उपस्थित होते. आमच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप सदावर्ते यांच्या संचालकांनी केला. त्यानंतर मारहाण सुरु झाली. यानंतर मोठा राडा झाला. या राड्यानंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांकडून दोन्ही गटांची तक्रार घेण्याचे काम सुरु आहे.

आज कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी काही विरोधी संचालकांनी आमच्या महिलांचा अपमान केला. महिलांचे कपडे फाडण्यात आले, मंगळसूत्र तोडण्यात आले, जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, त्यामुळे हा वाद निर्माण झाला. वारंवार त्या संचालकांकडून महिलांचा अपमान होत आहे. त्यामुळे राडा झाला. या प्रकरणाची फिर्याद देण्यासाठी आम्ही पोलीस ठाण्यात आलो आहोत असे एका संचालकाने घटनेबद्दल सांगितले. 
 


सम्बन्धित सामग्री