राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अर्थखात्याच्या मागणीवर चर्चा की मंत्रिमंडळात बदल? काय आहे भेटीमागील कारण?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले.

राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अर्थखात्याच्या मागणीवर चर्चा की मंत्रिमंडळात बदल? काय आहे भेटीमागील कारण?
sunetra pawar cm devendra fadnavis

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणाऱ्या घटना सध्या घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज, रविवारी सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आले असून राज्यातील अर्थखात्याबाबत यावेळी चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सुनेत्रा पवार पक्षाची कोअर कमिटीची बैठक पार पडली. दोन तास बैठकीत चर्चा झाल्यानंतर सुनेत्रा पवार पक्षाचे नेते मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटी बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि इतर कोअर कमिटीचे सदस्य तसेच नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे आज अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. बैठकीत पक्षाची रणनीती, राज्यातील राजकारणात होणारी घडामोड, पक्ष बांधणी यावर बैठकीत चर्चा करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : राजकीय वर्तुळात खळबळ! भाजप शहराध्यक्षला आधी अटक, आता पक्षाकडून निलंबनाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number