500 कोटींवरून मनोज जरांगेंचा ‘ऑडिओ बॉम्ब’, कथित ऑडिओ क्लिपमध्ये कोणा कोणाचे नावं?

मनोज जरांगे पाटलांच्या 500 कोटी रुपयांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंनी पुरावे दाखवा असं आवाहन त्यांना केलं. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप उघड केली आहे.

500 कोटींवरून मनोज जरांगेंचा ‘ऑडिओ बॉम्ब’, कथित ऑडिओ क्लिपमध्ये कोणा कोणाचे नावं?
Manoj Jarange Patil

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड मधील नारायणगडावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांचा गंभीर आरोप केला होता. यावेळेस त्यांनी म्हटले होते की, ‘एकनाथ शिंदे यांनी भाजपाला सांगितलं की आम्ही जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये दिले, अशी भाजपमध्ये चर्चा आहे’ जरांगेंच्या या मोठ्या गौप्यस्फोटानंतर दिल्लीतून पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली.

नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचं निमंत्रण राष्ट्रपतींना देण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत होते. त्यावेळेस त्यांनी पुरावे सादर करा असं थेट आवाहन जरांगे पाटलांना दिलं होतं. यावर पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी, आता आपण पुरावे देणार असल्याचे म्हटले. मी गुरुवारी सकाळी 11 वाजता पुराव्यासहित सांगणार आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली.

हेही वाचा- जरांगे पाटलांकडून 500 कोटीचा आरोप, एकनाथ शिंदेंकडून थेट प्रतिआव्हान; म्हणाले, “पुरावे दाखवा”

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे एक ऑडिओ क्लिप उघड केली आहे. यात जरांगेंना बदनाम करण्याचा कट रचल्याचे ऐकू येत आहे. मनोज जरांगे दावा करत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे मार्फत मनोज जरांगे यांना 500 पोहोचल्याचा भाजपच्या IT सेलच्या महिला सदस्याकडून या दावा करण्यात आला आहे. ही ऑडिओ क्लिपमध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपच्या कॉन्फरन्स मीटिंगची असल्याचं सांगण्यात येत आहे.

यावेळेस क्लिप सादर करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘मराठा समाजासाठी चांगले काम करताना किती बदनामीला सामोरे जावे लागते, याचा मी अनुभव घेतला. माझ्याविरोधात काही जण षडयंत्र रचत आहेत. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दखल घ्यावी, शक्य असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणात लक्ष घालावे’, असे आवाहन करीत मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या आरोपांसंदर्भात ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडला. या क्लिपने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. मात्र जय महाराष्ट्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number