श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मतदान रविवारी पार पडले. यात 21 जागेसाठी 83 उमेदवारांचे भवितव्य मत पेटीमध्ये बंद झाले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यांना त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार आणि बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांचे आव्हान होते. तीन पॅनेल आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत आपापल्या परीने ताकद लावली आहे यामुळे आता सभासदांनी कोणाला पसंती दिली आहे, हे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेची सूत्रे कोणाकडे जाणार, याकडे सभासदांसह बारामती, पुरंदर, खंडाळा व फलटण तालुक्यांतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांची ही पहिलीच निवडणूक होती.
या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्यासह सर्वच विरोधकांचा सुपडा साफ करून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचे सर्व सर्व 21 उमेदवार निवडून आले आहेत. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामतीच्या सहकार क्षेत्रातील सत्तेचा गड, दिवंगत अजितदादा पवार यांच्या राजकीय वर्चस्वाचे प्रतीक आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बाजी मारली आहे. तर मतमोजणीअंती युगेंद्र पवार यांच्या पॅनलमधील एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. या पॅनलला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
तर दुसरीकडे सोमेश्वरच्या निवडणुकीत बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांचा देखील दारुण पराभव झाला. पुरुषोत्तम जगताप यांचा संपूर्ण पॅनल पिछाडीवर आला असून त्याचे सर्व उमेदवार पराभवाच्या छायेत झाले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देत बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांनी 21 जणांचे पॅनल या निवडणुकीत उभा केले होते. मात्र सोमेश्वरच्या मतदारांनी बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगताप यांचा दारुण पराभव केला आहे.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार गट क्रमांक 2 गट वाल्हा मुरूम मधील पॅनल मधील तीन ही उमेदवार विजयी झाले. आतापर्यंत 21 पैकी सात उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचे विजयी झाले आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्यासह सर्वच विरोधकांचा सुपडा साफ करून बारामतीवर आपलंच निर्विवाद वर्चस्व असल्याचं सिद्ध केलं आहे.
जय पवार स्व.अजित पवार यांच्या स्मृती स्थळी विजयी उमेदवारांसह दाखल
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या लोकनेते विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल आहे. या निवडणुकीत 21 उमेदवार उभे होते त्यापैकी सर्वच्या सर्व 21 उमेदवार बहुमताने विजयी झाले आहे. बंडखोरी करून 21 जणांचा पॅनल केलेल्या पुरुषोत्तम जगताप आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठे आव्हान उभा केलं होतं. मात्र या दोघांच्या पॅनलला सोमेश्वर कारखान्याच्या मतदारांनी सपशेल नाकारत पराभवाचे धूळ चारली आहे. विजय झाल्यानंतर युवा नेते जय पवार आणि सर्व उमेदवारांनी स्वर्गीय अजितदादा यांच्या विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतिस्थळी जाऊन अजितदादा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आहे.. हा विजय अजितदादा यांच्या चरणी समर्पित असल्याचे सर्व उमेदवारांनी सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.