मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या 500 कोटींच्या कथित वाटपाच्या आरोपावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून महायुतीतील नेत्यांसह विरोधी पक्षातील नेतेही आपापल्या भूमिका मांडत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात संजय राऊत यांच्या चौकशीची मागणी केली आहे. 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप’मागचा मास्टरमाइंड कोण? संजय राऊत यांच्या भूमिकेची चौकशी करा. भाजप, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांची बदनामी करण्याचे षड्यंत्र. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा. वाशीतील वॉर रूमपासून ‘सामना’ कार्यालयापर्यंत चौकशी करा. ऑडिओ क्लिपचे सत्य बाहेर आणा. एआयच्या मदतीने ऑडिओ क्लिप बनवल्याचा संशय. संजय राऊत यांची एसआयटीमार्फत चौकशी करा. 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात आधी सत्य शोधा, दोषींवर कारवाई करा. वाशीतील वॉर रूम आणि ‘सामना’ कार्यालयाच्या भूमिकेची चौकशी करा. ऑडिओ क्लिपचे सत्य समोर आणण्यासाठी निष्पक्ष तपासाची गरज. ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होऊ द्या.’
‘ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करा. 100 कोटींचा आकडा बदलून 500 कोटी कसा झाला. ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करा. ऑडिओ क्लिपमध्ये 500 कोटींच्या उल्लेखावेळी गॅप असल्याचा दावा. सत्यता तपासणे आवश्यक. ऑडिओ क्लिपची स्क्रिप्ट कोणी लिहिली? प्रत्येक संवादाची आणि आवाजाची चौकशी करा. ऑडिओ क्लिपच्या सत्यतेचा फैसला तांत्रिक तपासातूनच संशयितांची सखोल चौकशी करा! ऑडिओ क्लिपच्या सूत्रधाराचा शोध सुरु आहे. भाजप, शिंदे आणि जरांगे यांना लक्ष्य करणाऱ्या ऑडिओ क्लिपमागचे सत्य बाहेर आणा. आरोप-प्रत्यारोप नकोत. 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करा! ऑडिओ क्लिप कुणी तयार केली, कुणी पोहोचवली. संपूर्ण साखळीचा तपास करा. महायुतीत फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. ऑडिओ क्लिप प्रकरणातील प्रत्येक दुवा तपासा.’
भाजपच्या कोअर टीमचा ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख करण्यात आला, यावर नवनाथ बन म्हणाले की, “भाजपच्या कोअर टीममधील नावांची निवड कोणी केली. ऑडिओ क्लिपमागचे नियोजन तपासा. सहा महिने आधीपासून स्क्रिप्ट तयार केल्याचा दावा. राजकीय नेत्यांची नावे वापरून कथानक रचल्याचा आरोप. सत्य बाहेर येऊ द्या. स्क्रिप्ट रायटिंगच्या आरोपांपासून एआयच्या वापरापर्यंत. प्रत्येक दुव्याची तपासणी आवश्यक आहे.”
हेही वाचा- जरांगेंना 500 कोटी पवारांनी की शिंदेंनी दिले? ससाणेंच्या प्रश्नाने प्रकरणाला नवं वळण
महायुतीतील ऐक्य आणि विरोधकांच्या कथित षड्यंत्रावर टीका
फडणवीस-शिंदे यांच्यात भांडण लावण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. महायुतीचे ऐक्य अभेद्य. विरोधकांच्या कथित षड्यंत्रांना महाराष्ट्राचे उत्तर. महायुतीत ठिणग्या पाडण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचा मनसुबा पूर्ण होणार नाही. सत्तेसाठी गैरसमज पसरवण्याचे राजकारण चालणार नाही. महायुती महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र. चाणक्य कोण, हे महाराष्ट्राला ठाऊक. जनतेनेच राजकीय नेतृत्वाचा कौल दिला. चाणक्याच्या गप्पा नकोत. 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचे सत्य सांगा. फडणवीस आणि अमित शाह यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास. आरोपांच्या राजकारणाला उत्तर मिळेल. राजकीय बुद्धिमत्तेच्या गप्पांपेक्षा ऑडिओ क्लिपची सत्यता सिद्ध करा.
महायुतीतील वादाच्या चर्चेला प्रत्युत्तर
महायुतीत वाद नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी फडणवीस-शिंदे एकत्र. उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली. महायुतीत संघर्ष असल्याच्या चर्चेला पूर्णविराम. महायुतीचे ऐक्य कायम. विरोधकांच्या गैरसमज पसरवण्याच्या प्रयत्नांना थारा नाही. महाराष्ट्राचे हित सर्वोच्च महायुती एकदिलाने काम करत राहणार.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेचा संदर्भ
फडणवीस, शिंदे आणि जरांगे यांना लक्ष्य केल्याचा आरोप. षड्यंत्रामागचे सत्य तपासा. तीन नेतृत्वांना नुकसान झाल्यास फायदा कुणाचा. ऑडिओ क्लिपच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह. महायुतीच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. निष्पक्ष चौकशीची मागणी. पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेचा संदर्भ देत भाजपचा सवाल. ऑडिओ क्लिपमागचे सूत्रधार कोण?