“विजय आमच्या बाजूने होता मात्र….” गोकुळच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का; हसन मुश्रीफांनी मित्रपक्षावरचं खापर फोडलं

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भाजपसोबत वाद असल्यामुळे पराभव झाला असा थेट आरोप करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी पराभवाचे खापर मित्रपक्षावर फोडले आहे.

“विजय आमच्या बाजूने होता मात्र….” गोकुळच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का; हसन मुश्रीफांनी मित्रपक्षावरचं खापर फोडलं
Hasan Mushrif

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद निवडणुकीतील पाच पैकी तीन जागांवर महायुतीचा पराभव झाला. या पराभवानंतर सत्ताधारी पक्षातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. शिंदेसेना-भाजपमध्ये जुंपलेली असतानाच आता राष्ट्रवादीनेही भाजपवरवर टीका केली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भाजपसोबत वाद असल्यामुळे पराभव झाला असा थेट आरोप करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी पराभवाचे खापर भाजपवर फोडले आहे.

हेही वाचा- ‘धंगेकरांमुळेच महायुतीचा पराभव…’; भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?

यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, “भाजपसोबतचा वाद मिटला नाही, त्यामुळे 13 आणि 12 असा निकाल लागला. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड होणार नाही. सतेज पाटील यांच्याकडे 13 हा आकडा असला, तरी 14 हा आकडा होणार नाही. बंटी पाटील यांना एवढे मोठे बहुमत मिळाले असेल, तर त्यांनी अध्यक्ष निवडून दाखवावा. आम्ही सहकार्य करणार नाही, त्यामुळे आज ही निवडणूक होणार नाही. या निवडणुकीत दुःख एवढेच आहे की, माझ्या मुलाचा पराभव झाला.”

“माझी चूक झाली होती की, जनरल प्रवर्गातून निवडणूक लढवायला हवी होती. मात्र आरक्षित जागेवरून निवडणूक लढवली. माझ्या मुलाला या निवडणुकीत टार्गेट करण्यात आले. सतेज पाटील यांनी जातीयवादी प्रचार केला होता, हा माझा आरोप आहे. मतांची सरासरी पाहिली, तर सतेज पाटील यांच्या पॅनलपेक्षा आम्हाला अधिक मते मिळाली आहेत. मग विजय कोणाचा आहे? विजय आमच्या बाजूने होता. मात्र 13 उमेदवार तांत्रिकदृष्ट्या निवडून आले आहेत. आज अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत पाटील आहेत. बंटी पाटील त्यांना अध्यक्ष करणार होते. शशिकांत पाटील यांना भविष्यात अध्यक्ष बनवण्याची जबाबदारी आम्हालाच पार पाडावी लागणार असल्याचे सूचक विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.”

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number