सत्ताधारी-विरोधकांनी हलक्यात घेतलं, मात्र अपक्ष उमेदवाराने अख्खा गेम फिरवला; आता नितेश कराळे विधानसभा 2029 ची निवडणूक लढवणार

आगामी राजकीय वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट करताना नितेश कराळे यांनी २०२९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

सत्ताधारी-विरोधकांनी हलक्यात घेतलं, मात्र अपक्ष उमेदवाराने अख्खा गेम फिरवला; आता नितेश कराळे विधानसभा 2029 ची निवडणूक लढवणार
nitesh karale

नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवला असला, तरी या निवडणुकीत कराळे मास्तरांच्या भूमिकेची राज्यभर चर्चा झाली. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या कराळे मास्तरांनी मिळवलेल्या मतांमुळे त्यांच्याकडे किंगमेकर म्हणून पाहिले जात आहे. या निवडणुकीनंतर त्यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली असून, २०२९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. तसेच, आतापासूनच बूथ पातळीवर तयारी सुरू करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्याला कमी लेखले. मागील वर्षी साडेसहा ते सात हजार मते मिळाल्यामुळे यंदा चार हजारांच्या आसपासच मतदान होईल, असा त्यांचा अंदाज असावा. मात्र, ज्या ठिकाणी राजकीय पक्षांचे सदस्य पोहोचले नाहीत, तिथे आपण पोहोचलो, असे कराळे मास्तरांनी सांगितले.

हेही वाचा : मोठी बातमी! पूर्णेकर मृत्यूप्रकरणात मीनाक्षी शिंदे यांचा अखेर राजीनामा

शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग, विविध शासन निर्णय मागे घेण्यासाठी केलेली आंदोलने आणि नेत्यांच्या वाहनांसमोर उभे राहून विरोध करण्याची भूमिका यामुळे मोठा वर्ग आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटले. लोकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे दोन्ही राष्ट्रीय पक्षांना दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये मोठा फटका बसल्याचा दावाही त्यांनी केला. अभिजीत वंजारी यांना विजयी करण्यासाठी मतदारांना दुसऱ्या पसंतीचे मत महत्त्वाचे असल्याचे आपण सांगितले होते, असेही कराळे मास्तरांनी नमूद केले. भाजपच्या उमेदवारांनीही दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी प्रयत्न करायला हवे होते. आपल्या नावासमोरील दुसऱ्या पसंतीच्या मतांची संख्या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या नावासमोरील मतांची संख्या जवळपास सारखीच होती. दोन्ही बाजूंची सुमारे आठ हजार मते अवैध ठरल्याचाही त्यांनी उल्लेख केला. भाजपने दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी प्रयत्न केले असते, तर निकाल वेगळा लागला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले. या निकालातून संबंधितांनी धडा घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number