शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज अमरावती दौरा झाला. अमरावती शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ त्यांनी झंझावाती सभाही घेतली होती.अमरावतीमध्ये अनेक उमेदवार हे रिंगणात असल्याने या लढतीकडे महायुतीचे विशेष लक्ष आहे.
किरण सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदे यांनी रणनीती आखत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले होते. याच वेळी बोल असताना शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांना टोला लगावला. ”महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात असलेलं सरकार आणलं, लाडक्या बहिणींची योजना जी सुरु केली, ती आजही सुरु आहे. कोणी माइका लाल आला तरी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही जे बोलतो ते करतोच,म्हणूनच लोक आमच्याबरोबर आहेत,”असे शिंदे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.