“शिंदेंनी सापाला दूध पाजून ओबीसींचं वाटोळं केलं”, वाघमारेंचा शिंंदेंना खोचक टोला

मनोज जरांगेंनी केलेल्या 500 कोटींच्या वाटपावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आक्रमक होत संबंधित प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

“शिंदेंनी सापाला दूध पाजून ओबीसींचं वाटोळं केलं”, वाघमारेंचा शिंंदेंना खोचक टोला
Navnath Waghmare

500 कोटींच्या कथित वाटपावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. या प्रकरणावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आक्रमक होत संबंधित प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तसेच या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तर या प्रकरणावर प्रतिक्रिया देत वाघमारे यांनी यावेळी शिंदे यांच्यावर टीका करत, “ज्या विषारी सापाला दूध पाजले, तोच आता शिंदेंना दंश मारतोय,” अशा शब्दांत राजकीय टोला लगावला.

हेही वाचा- “तुमची सुपारी घेतलीय, दहा लाख द्या, अन्यथा…” छत्रपती संभाजीनगरातील उपमहापौरांना धमकीचा फोन

शिंदेनी सापाला दूध पाचवून ओबीसीच वाटोळं केलं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी एकनाथ शिंदे वर टीका केली. शिंदेच्या रसदीवरच हे आंदोलन चाललं म्हणजे व्यवसाय जरांगे सुपारी भादर आहेत. हे रामदास कदमचे चिरंजीव कोणते गृहराज्यमंत्री कदम आहेत.

ते म्हणलेले त्याच्यात काही चुक नाही. आम्ही तीन वर्षापासून सांगतोय परंतु त्यांना उशिरा कळालंय जाऊद्या उशिरा का होईना, पण त्यांना शहानपण सुचलंय कारण की या सापाने त्यांना दंश मारल्याच्यानंतर कळलं, असं नवनाथ वाघमारे म्हणाले आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number