निर्मला सीतारामन यांच्या पतींची SIR विरोधी आंदोलनात एन्ट्री; 23 ऑक्टोबरला नेमकं काय घडणार?

Anti-SIR Protest : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर हे 23ऑक्टोबर रोजी होणाऱ्या SIR विरोधी आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांच्या सहभागामुळे या आंदोलनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले असून, या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे.
परकला प्रभाकर
Parakala Prabhakar

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्तपासणी विरोधात देशभरात आवाज सध्या आवाज उठू लागलेला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर हे 23 ऑक्टोबरच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी ही करणार आहेत, अशी माहिती समोर आलेली आहे.

SIR विरोधात आंदोलनाची हाक
पीपल अगेन्स्ट एसआयआर या नव्याने स्थापन झालेल्या आघाडीने हा जनमोर्चा पुकारलेला आहे. 14 ऑक्टोबर रोजी स्थापन झालेल्या या आघाडीमध्ये असंख्य विद्यार्थी, युवक, शेतकरी, कामगार, महिला तसेच दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, दिव्यांग, तृतीयपंथी या सर्व संघटनांचा समावेश आहे. हर हात में तिरंगा, हर गली में जंतर मंतर हा या आंदोलनचा नारा असणार आहे तर लोकशाही पुनर्संचयित करणे हा मुख्य उद्देश आहे. या दिवशी व्यासपीठावर प्रभाकर यांच्यासह अभिनेते प्रकाश राज, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके तसेच एआयएसयूच्या अध्यक्षा नेहा बोरा या असणार आहेत.

हेही वाचा- भाजपच्या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्राचा दबदबा! सायली कुलकर्णी यांच्यावर मोठी जबाबदारी

परकाला प्रभाकर यांचा हल्लाबोल
एवढंच नव्हे तर शेतकरी नेते राकेश टिकैत, लेखक तुषार गांधी, जेएनयूच्या माजी अध्यक्षा आयशे घोष यांच्याही सहभाग असण्याची शक्यता सांगितली जात आहे. या आघाडीच्या मुख्य मागण्या म्हणजे, मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरुन हटवावे आणि खटला चालवणे, एसआयआर ही प्रक्रिया रद्द करणे तसेत वगळलेल्या मतदारांची नावे पुन्हा एकदा यादीमध्ये समाविष्ट करुन घेणे.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version