मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज मुंबईत ‘गर्जना’ मोर्चा काढण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे मोर्चाचे नेतृत्व करणार असून ‘गर्जना’ मोर्चासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी ठाकरे बंधुंनी जनतेला केलं होत. सकाळी 10.00 वाजता मोर्चाला सुरुवात झाली असून मेट्रो सिनेमा ते मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयापर्यंत काढण्यात आला. तसेच शेवटी एक जाहीर सभा पार पडली आहे.
या मोर्च्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सक्रिय पाठिंबा दिला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण झालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावर आणि SIR प्रक्रियेविरोधात काय भूमिका मांडतात याकडे सर्वांच लक्ष लागलेलं होत.
राज ठाकरेंनी भाषणादरम्यान दोन प्रमुख मागण्या केल्या. यात पहिली मागणी म्हणजे, महाराष्ट्रात आतापर्यंत झालेली सर्व SIR प्रक्रिया रद्द करा आणि दुसरी मागणी म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. तसेच या मोर्चात बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमाकर यांच्यावर सडकून टीका केली.
राज ठाकरे म्हणाले की, “उन्हामुळे इथे वातावरण तापलं देशात वातावरण तापलं आहे ज्ञानेश कुमारमुळे, 2017 पासून सांगत आहे की चोऱ्या सुरू झाल्या.सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांना भेटली सगळ्यांना संगीत होती. जो घोळ सुरू आहे त्यावर पाऊल उचललं पाहिजे. निवडणुकीवर बहिष्कार टाका. अशाप्रकारे मत कमी होऊ शकत नाही आणि भाजपची मतं अशी वाढू शकत नाही.जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते बसले आहेत. मी काय बोलत होतो ते आता सगळ्यांना समजले. संपूर्ण बहुमत ताण मिळाला. महाराष्ट्रात सन्नाटा असा कोणता विजय असतो की, लोकांमध्ये उत्साह नव्हता. 2024 लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेत 40 ते 60 लाख मतदार वाढले. असे कोणता वायग्रा आहे.”
“भाजपला विधानसभेत 3 कोटीहून अधिक मत पडली. एक कोटी मत कशी वाढली. सगळ्या गोष्टी आता उघड झाली आहे. सत्ताधाऱ्यांना एकाच गोष्ट सांगायची आहे. आम्हाला राग नाही असूया नाही. पण सत्ता कशी राबवता आणि कशातून राबवता हे महत्त्वाचं. मनमानी कारभार सुरू आहे. एकाच उद्योगपतीला सगळ द्यायचं. आम्ही काहीही केलं तरी फराळ पडत नाही हे येत कुठून. निवडणूक आयोगाला बांधल्याशिवाय होऊ शकत नाही. निवडणूक आयोग आमच्याबरोबर असेल कसेही निवडून येऊ.”
“या देशाची आर्थिक स्थिती बरबाद करू. अन्न धान्याचे, पेट्रोलचे भाव वाढवू. रांगेत उभे करू तुम्हाला. उद्या जर पाऊल उचललं तर सत्ता जाऊ शकते पण अशी भीती कोणतीही दिसत नाही. उद्योगपती या देशाला हवे आहेत. काँग्रेसच्या काळात अनेक उद्योगपती मोठे झाले. यांच्या काळात फक्त एकच उद्योगपती दिसतो. सुप्रीम कोर, उच्च न्यायालय, न्युज चॅनेल ताब्यात घेतले आहे. उद्या कोणत्यातरी पक्ष सत्तेवर असेल तर तुम्ही काय करणार. तुम्ही देशाचा ढाचा बदलत आहात. आजचा मोर्चा त्याच्या विरोधातील आहे. सत्तेतील लोकांनी पण विचार करण गरजेच. दुसरे ज्यावेळीन्येतील सत्तेत आणि त्यांनी दामदुपटीने केली तर तुम्ही काय कराल. लोकांना अंधारात का ठेवत आहार. किती काळ चालणार.”
“दोन विषय महत्त्वाचे मांडायचे आहे. SIR रद्द झाला पाहिजे. माजी केंद्रीय गृहसाची r.k सिंह यांनी काय सांगितले ते बघा. SIR बेकायदेशी आहे. विधानसभेत 40 ते60 लाख वाढवण्याचे सत्ता घ्यायची आणि आता दोन कोटी बाहेर काढले. कोण आहेत हे दोन कोटी? दिल्लीत जेव्हा बोलल तेव्हा SIR बंद करा आणि मतपत्रिकेवर मतदान घ्या. या दोन गोष्टी ज्या तर दूध की दूध पाणी की पाणी होईल.”