‘2029 पर्यंत फडणवीसांना मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं’; भरसभेत राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
raj thackeray devendra fadnavis
raj thackeray devendra fadnavis

मुंबई : मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिघेही एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. प्रशांत कुलकर्णी संपादित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या मराठी व्यंगचित्रकारांच्या इतिहासावरील विशेष ग्रंथाचा प्रकाशन सोहळ्याला या मान्यवरांनी उपस्थितीत दर्शवली होती. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी आशिष शेलार यांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारली. ते म्हणाले की, यापुढे पण मी मुख्यमंत्र्यांना बोलवत जाईन आणि ते येत जातील. 29 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं. राज ठाकरेंच्या या विधानानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी भाषण करताना फडणवीस यांना कोपरखळी मारली. दरम्यान, राज ठाकरेंच्या आधी बोलताना शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला मारला होता. उद्धवजी, तुम्ही समजून घ्या, राज ठाकरे बोलले की मुख्यमंत्री येतात. यावर राज ठाकरेंनी उत्तर दिले.

हेही वाचा : “मी शेतकऱ्यांवर बोललो नाही” शेतकरी मृत्यूप्रकरणी वादग्रस्त विधानावरून संजय गायकवाडांचे घुमजाव

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version