महाराष्ट्र: लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेत एकत्र निवडणूक लढलेल्या महाविकास आघाडीत आता फूट पडली आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचे बिगूल वाजवलंय. एकदा स्वबळावर लढून आम्हाला पाहायचं आहे, असे सांगत ते आघाडीमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
ठाकरे गटाला मुंबई का हवीय?
1.मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपला आहे
2.याआधी पालिका निवडणुकीत सातत्याने काँग्रेसविरोधात ठाकरे गट लढलेत
3.मूळ शिवसेना हा मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष होता
4.काँग्रेसला ही भूमिका न पटणारी असल्याने एकत्र लढले तर मतांना फटका बसणार
5.2017 मध्ये एकत्रित शिवसेनेला भाजपाचा फटका बसला होता
6.मागील निवडणुकीत काँग्रेसला 31 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा होत्या
7.आता एकत्रित निवडणुकीत दोन्ही पक्षांना फायदा होईल आणि ठाकरेंना नुकसान
8.पक्षाचे नुकसान टाळण्यासाठीच ठाकरे गटाचा सावध पवित्रा
9.पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ठाकरे गटाचे 'एकला चलो रे'
10.मुंबई पालिकेची तिजोरी स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा अट्टाहास
आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राशपला ठाकरे गटाच्या या निर्णयाची कल्पना नसल्याने त्यांनाही ठाकरे गटाच्या या भूमिकेचं आश्चर्य आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांच्या घटक पक्षातच आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. याआधी नेतृत्वावरून सुरू झालेला हा वाद आता अस्तित्वापर्यंत पोहोचलाय. महाविकास आघाडी सत्तेसाठी एकत्र आली होती. सत्ता न मिळाल्याने त्यातील घटक पक्षांनी आपापला झेंडा हाती घेवून त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.