‘जरांगेंकडे नावं असतील तर त्यांनी जाहीर करावीत’; ‘त्या’ कथित ऑडिओ क्लिपवरून संजय शिरसाटांनी दिली प्रतिक्रिया

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
sanjay shirsat manoj jarange patil
sanjay shirsat manoj jarange patil

विजय चिडे, प्रतिनिधी 

संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली असून जरांगेंनी ऑडिओ क्लिपमधील नावे जाहीर करावीत, असे आवाहन केले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, काल मनोज जरांगे पाटलांनी जे काही आरोप केले आणि त्यांनी एक प्रश्न बेसिक विचारला होता की, 500 रुपये घेतले का आणि मला दिले का? याचं 500 कोटी, याचं स्पष्टीकरण शिंदे साहेबांनी दिलंय. तर शिंदे साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि त्यांनी शिंदे साहेबांनी एक गोष्ट ही सांगितली आवर्जून की, याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी.  आज मनोज जरांगे पाटलांनी जी काही आक्रमक, जी काही व्हिडिओ क्लिप ऐकवली, ती मी सुद्धा केअरफुली ऐकली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये काय आहे? चार जणांचा कोणतरी टोळका आहे आणि ते काही राजकारणात काय केलं पाहिजे, याच्यावर ते भाष्य करतायत. पार बांगलादेशच्या तुकड्यापासून तो पालघरमध्ये काय झेंडा दाखवावा किंवा काय करावं तिथपर्यंत, पुन्हा कोणतेतरी दलित मुलाला, लोखंडे नावाच्या मुलाचा जो काही खून झाला, त्यावर बोलतात. म्हणजे अशा अनेक प्रकारचे भाष्य त्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतायत. आणि त्याच्यातच एक भाष्य हे ही आहे की, यांना हे पैसे दिले तर लोकसभेला फायदा होईल का विधानसभेला होईल?

पुढे शिरसाट यांनी नमूद केले की, मला वाटतं ही जी काही क्लिप आहे, याच्यातले जे आवाज आहे, हे एकदा चेक केलेच पाहिजे. कारण की बोलणारे एकमेकांशी कॉन्फरन्सवर बोलत आहेत. याचा अर्थ असा होतो की, यांनी हे ठरवून केलेलं जर षडयंत्र असेल, जसं जरांगे पाटलांना म्हणायचंय, मुळामध्ये त्यांनी ही क्लिप दाखवून एक चांगलं काम केलं, की असे षडयंत्र रचले जातात, हे त्यांनीच त्यांच्या क्लिपमधून त्यांनी जे काही प्रसारित केली, त्या क्लिपमधून दिसून आलेलं आहे. मग प्रश्न असा उरतो की, नेमकं षडयंत्र कोण कुणाच्या विरोधात करतंय? मग जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी करतात का, एकनाथ शिंदे साहेबांना डॅमेज करण्यासाठी करतात, त्यांना बदनाम करण्यासाठी करतायत? हे दोन्ही गोष्टी त्या क्लिपमधून आपल्याला आढळून येतात. तुम्हाला राजकारण करताना अशा प्रकारचा जर काही गोंधळ होत असेल, करत असाल, षडयंत्र रचत असाल, तर याची चौकशी झालीच पाहिजे, हे जरांगे पाटलांनी जे सांगितलं, त्याला आमचीसुद्धा सहमती आहे.

हेही वाचा : 500 कोटींवरून मनोज जरांगेंचा ‘ऑडिओ बॉम्ब’, कथित ऑडिओ क्लिपमध्ये कोणा कोणाचे नावं?

2024 च्या ऑक्टोबरचा, सप्टेंबर-ऑक्टोबरची ती क्लिप आहे. त्याचा वापर आता आणि अचानक कसा होतो आणि तो कोणी केलाय, याची चौकशी झाली पाहिजे. समाजामध्ये तेढ निर्माण झालाच नाही पाहिजे. समाजात-समाजामध्ये भांडण लावणं हा कुणाचाही उद्देश असता कामा नये. आणि तसं नाहीये. महाराष्ट्राची संस्कृती तशी नाहीच आहे. हा याच्या विरोधात, तो त्याच्या विरोधात, तो त्याच्या विरोधात आणि त्याच्यावर राजकारण करायचं. म्हणून आजचा जो शिंदे साहेबांवर आरोप केला होता, तो किती खोटा आणि कसा बदनाम करणारा होता, हे या क्लिपमधून सुद्धा दिसून आलेलं आहे. म्हणून आमची मागणी राहील प्रामुख्याने, आता ही एआयच्या मार्फत केलेली क्लिप आहे का, तशी ओरिजिनल आहे, याचा सगळ्याचा तपास हा सरकारने केला पाहिजे. त्यांचीच मागणी मी सांगतोय, मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version