“मला पण भाजपची ऑफर आली होती, पण…” काँग्रेसच्या ‘त्या’ माजी मुख्यमंत्र्याचा मोठा खुलासा

सोलापुरमधून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. मला पण भाजपची ऑफर आली होती असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेस जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

“मला पण भाजपची ऑफर आली होती, पण…” काँग्रेसच्या ‘त्या’ माजी मुख्यमंत्र्याचा मोठा खुलासा
Maharashtra Politics

सोलापुरमधून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. मला पण भाजपची ऑफर आली होती असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेस जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान काँग्रेस जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी संवाद साधत असताना त्यांचे नातू शिखर पाहरिया यांची पाठराखण केली. शिखर पाहरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनरबाजी केली होती. या संदर्भात बोलताना सुशीलकुमार यांनी ‘पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले म्हणून काय बिघडले’ म्हणत शिखर पाहरियाच्या कृतीचे समर्थन केले.

तसेच ते म्हणाले की, “परवा बातमी आली माझ्या नातवाने पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले, एक दिवस असं केल्याने काय बिघडली, मी सुद्धा नुकताच पंतप्रधानांना भेटतो. यामुळे काहीही बिघडत नाही आणि आपली फिलोसोफी बदलत नाही. मला देखील इकडे (भाजपमध्ये) या असं म्हटलं गेलं मात्र मी म्हटलं मी तिकडे (काँग्रेस ) आहे तर इकड(भाजप) मध्ये येऊन परत काय करणार. मी जिथे आहे (काँग्रेस मध्ये) तिथलच काम करणार, इकडं (भाजपमध्ये) येऊन परत तुमच्यात ढवळाढवळ नको.”

हेही वाचा- “शिंदेंनी सापाला दूध पाजून ओबीसींचं वाटोळं केलं”, वाघमारेंचा शिंंदेंना खोचक टोला

“भाजपमध्ये आलेल्या नवीन माणसांचे काय हाल होतात हे सुद्धा मी बघितलेल आहे, आता नाही 25 वर्षांपूर्वी सुद्धा असच होत होते. एकत्रित सगळेच गेले परत 4 ते 5 वर्षात पुन्हा परतले. राजकारणात देखील चुका होत असतात त्यामुळे पत्रकारांनी त्या चुकांचे विश्लेषण केले पाहिजे. नकळत एखाद्याकडून जर चूक झाली असेल तर ती समजून घेतली आहे.”

“आपली लोकशाही ही वर चढत जाणारी आहे, त्याला काळिमा लागता कामा नये. देशाचे पंतप्रधान हे जितकं माझ्याशी बोलतात तितकंच शरद पवारांशी ही बोलतात. शरद पवार तर त्यांना बारामतीला घेऊन जातात, कोण काय विचारत नाही, उद्घाटनाला वगैरे गेले तर काही बिघडत नाही. कितीतरी चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून (मोदी) होतात, वाईट ही घडल्या जातात. मात्र पत्रकारांनी याच विश्लेषण करून घेतलं पाहिजे.”

“मध्यंतरी RSS चे एक पुस्तक प्रकाशित झाले होते, मी आवर्जून ते पुस्तक चाळून बघितले, पॉलिटिकलं सायन्सचा विद्यार्थी म्हणून हे सगळं महत्वाचं आहे. काल मार्क्सवादी काम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते सोलापुरात येऊन गेले त्यांच्याविषयी ही मी माहिती घेतली, त्यांच ही साहित्य मी वाचतो. काम्युनिस्ट पार्टीचा इतिहास देखील किती मोठा आहे.”

“मला पण भाजपची ऑफर आली होती, पण…” काँग्रेसच्या ‘त्या’ माजी मुख्यमंत्र्याचा मोठा खुलासा

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number