‘मोहिते पाटलांमुळे सोलापूर जिल्हा बँक अडचणीत’, कल्याणशेट्टींचा रणजितसिंहावर हल्लाबोल; बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घमासान

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकलूजमध्ये प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यात रणजितसिंहांनी मांडलेल्या भूमिकेला कल्याणशेट्टी यांनी उत्तर दिले.

‘मोहिते पाटलांमुळे सोलापूर जिल्हा बँक अडचणीत’, कल्याणशेट्टींचा रणजितसिंहावर हल्लाबोल; बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घमासान
sachin kalyanshetti mohite patil

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात रणजितसिंहांनी मांडलेल्या भूमिकेला भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उत्तर दिले. यावेळी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मोहिते पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला. जिल्हा बँक अडचणीत आणण्यात मोहिते पाटील यांचा सर्वात मोठा वाटा, असे कल्याणशेट्टी म्हणाले. तसेच मोहिते पाटील यांनी शांत बसावं. आपोआप बिनविरोध निवडणूक होईल, असा हल्लाबोलही केला.

हेही वाचा : विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल! 5 जागांसाठी मतमोजणी सुरू; महायुती की महाविकास, आघाडी कोण बाजी मारणार?

काय म्हणाले सचिन कल्याणशेट्टी 

मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्यासमोर बसून भाजप पॅनल तयार करणार. भाजप आणि काही घटक पक्ष एकत्रित येऊन जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार. रणजीत सिंह यांनी सांगितल. शेतकऱ्यांची बँक आहे. निवडणुका झाल्या पाहिजेत. आम्ही सगळ्यांना बोलावलं. जे आले ते ठीक जे नाही आले, त्यांचे आम्ही घरी जाणार. शेतकऱ्यांची बँक बिनविरोध व्हावी, डीसीसी बँकेबाबत मला कळवळा आहे. शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळे त्याची आम्हाला तळमळ आहे. हे सर्व भासवण्यासाठी रणजीतसिंह मोहिते पाटील हे एक संमत्ती कार्ड खेळत आहेत. यातून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करताय. रणजीतसिंह मोहिते पाटील बोलत असताना सांगितलं, चेअरमन असताना एक रुपया न घेता, बँकेला चांगल्या स्थितीत आणलं. रणजीतसिंह यांनी पाच वर्षाचा त्यांचा कार्यकाळ मांडू नये, आम्हाला जसं कळतं तशी जिल्हा बँकेची सूत्र तुमच्या ताब्यात. शेतकऱ्यांची बँक म्हणता, ती बँक वैयक्तिक मालमत्ता सारखी तुम्ही वापरली. मोहिते पाटील घरातले तीन ते चार संचालक म्हणून जिल्हा बँकेवर राहिलेत. बँकेतून पैसे किती उचलले आणि किती भरले. आज घडीला बँकेचे देणे किती. जिल्हा बँक अडचणीत आणण्यात सर्वात मोठा वाटा मोहिते पाटील यांचा आहे. मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना चार एकरवर 90 कोटी रुपये दिले होते. रणजीतसिंह मोहिते पाटील सहानभूती मिळवण्यासाठी सगळ्यांच्या घरी जाणार आहेत, असे कल्याणशेट्टी यांनी नमूद केले.

पुढे कल्याणशेट्टी यांनी म्हटले की, मोहिते पाटील हे राजकारणात स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला भ्रम करण्यासाठी भूमिका घेऊ नका. कोण कसे पैसे घेतले, यासाठी सविस्तर बोलायचं असेल तर मी यासाठी अजून एक प्रेस घेईल. जिल्हा बँकेतील 88 नुसार जर कारवाई झाली तर दोष पत्र कसे ठेवले. जिल्ह्यातील लोकांनी वाचली तर मोहिते पाटलांचा खरा रंग जिल्ह्याला लक्षात येईल. मोहिते पाटलांनी शांत रहावं, निवडणूक आपोआप बिनविरोध होईल. अकलूजला घरी बसून सगळ्यांना अकलूजला या म्हणतात, आता ती परिस्थिती राहिली नाही. तुमच्या शब्दाला किंमत राहिली नाही. विजयदादा होते, त्यावेळेस सर्व ऐकत होते. पण सध्या तुमची किंमत, पत संपली आहे. बिनविरोधची भाषा कोणी बोलायची असती, जे राजकीयदृष्ट्या शक्तिशाली आहेत. त्यांनी आवाहन करायचं असतं.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number