मतमोजणी केंद्रावर गोंधळ! आठ मतपेट्यांना अधिकृत सीलचं नाही; मविआ उमेदवाराने नोंदवला आक्षेप, नेमकं काय घडलं?

मतमोजणी सुरू असतानाच आठ मतपेट्यांना अधिकृत सील नसल्याचे समोर आल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी यावर आक्षेप नोंदवला.

मतमोजणी केंद्रावर गोंधळ! आठ मतपेट्यांना अधिकृत सीलचं नाही; मविआ उमेदवाराने नोंदवला आक्षेप, नेमकं काय घडलं?
pune counting centre

पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर आज सकाळी अचानक मोठा गोंधळ उडाला. मतमोजणी सुरू असतानाच आठ मतपेट्यांना अधिकृत सील नसल्याचे समोर आल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी यावर आक्षेप नोंदवला. या प्रकारामुळे निवडणूक अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या वादाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रावरील वातावरण तापले असून सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणी प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळपासून बालेवाडी येथील केंद्रावर मतमोजणी सुरू झाली. प्राथमिक फेऱ्यांची प्रक्रिया सुरू असतानाच काही मतपेट्या तपासणीसाठी टेबलवर आणण्यात आल्या. त्या वेळी आठ मतपेट्यांना आवश्यक असलेले निवडणूक आयोगाचे अधिकृत सील नसल्याचे महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी दावा केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारला. विनासील मतपेट्या आढळल्याचे समजताच मतमोजणी केंद्रावर उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला. पोलिंग एजंट्सनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या मतपेट्या केंद्रात कशा आल्या, असा थेट सवाल केला. या गोंधळामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आक्षेपांची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काही काळासाठी मतमोजणी प्रक्रिया स्थगित केली.

हेही वाचा : विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल! 5 जागांसाठी मतमोजणी सुरू; महायुती की महाविकास, आघाडी कोण बाजी मारणार?

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number