Sanjay Raut on Mahesh Kothare: मुंबईत झालेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी उघडपणे जाहीर केलं की, ते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त आहेत. भाजपा म्हणजे आपलं घर आहे. मी स्वतः भाजपाचा आणि मोदीजींचा भक्त आहे. पुढील वर्षी मुंबई महापालिकेत कमळ फुलणार यात मला शंका नाही, असा विश्वास व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - Solapur BJP Conflict: सोलापूरमध्ये भाजपचे अंतर्गत कलह उफाळले; कार्यकर्त्यांचा ‘ऑपरेशन लोटस’ला तीव्र विरोध; मंत्री जयकुमार गोरे चिंतेत
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी महेश कोठारे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'ते नक्की मराठी आहेत का, यावरच शंका वाटते. ते कलाकार आहेत, पण लक्षात ठेवा तुमचे सिनेमे फक्त भाजपवाल्यांनीच पाहिलेले नाहीत. असं बोललात तर तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा दाबेल, असं वक्तव्य करत राऊतांनी महेश कोठारी यांना चिमटा काढला आहे.
हेही वाचा - Dharashiv Accident : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला!; कारच्या धडकेत 4 भाविकांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर
एकीकडे कोठारे यांना भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार पाठिंबा मिळत असताना, दुसरीकडे त्यांच्या भाजप प्रेमाच्या घोषणेवरून विरोधकांनी चांगलाच हल्ला चढवला आहे. दरम्यान, महेश कोठारे यांचा हा कार्यक्रम भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मागाठाणे येथील उपक्रमाचा भाग होता. या ठिकाणी माजी खासदार गोपाळ शेट्टी, भाजप उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, तसेच उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बाळा तावडे हेही उपस्थित होते. कोठारे यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत भाजप हा 'नव्या पिढीला संधी देणारा पक्ष' असल्याचं म्हटलं. त्यांनी हसत-खेळत आठवण सांगितली की, 'एकदा पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो, तेव्हा म्हटलं होतं की आम्ही फक्त उमेदवार नाही, तर मंत्री निवडून देत आहोत.'